महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Schizophrenia : स्किझोफ्रेनिया असलेल्या लोकांमध्ये होते जनुक उत्परिवर्तन

स्किझोफ्रेनिया ( Schizophrenia ) या मानसिक आजारात रुग्णाला भ्रम होऊ लागतो. यावरून स्किझोफ्रेनियाने ग्रस्त असलेले लोक केवळ स्वतःलाच नव्हे तर इतरांनाही हानी पोहोचवू शकतात.

schizophrenia
schizophrenia

By

Published : Apr 15, 2022, 12:37 PM IST

स्किझोफ्रेनिया ( Schizophrenia ) या मानसिक आजारात रुग्णाला भ्रम होऊ लागतो. यावरून स्किझोफ्रेनियाने ग्रस्त असलेले लोक केवळ स्वतःलाच नव्हे तर इतरांनाही हानी पोहोचवू शकतात. मात्र, ही समस्या योग्य वेळी ओळखून पीडितेवर उपचार मिळाल्यास तो बऱ्याच अंशी सामान्य जीवन जगतात, असे डॉक्टरांचे मत आहे. परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये रुग्णांना या लक्षणांपासून मुक्त होण्यास बराच वेळ लागतो.

अमेरिकन मानसशास्त्रज्ञांचे संशोधन पीएनएएस जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. गंभीर स्किझोफ्रेनियाने ( Schizophrenia ) ग्रस्त असलेल्यांच्या जनुकांवर या रोगाच्या परिणामांमुळे गुंतागुंत वाढते. स्किझोफ्रेनिया अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

स्किझोफ्रेनिया

स्किझोफ्रेनिया या आजारात मेंदूच्या कार्यात व्यत्यय आणतोच. पण स्मरणशक्ती कमी होणे आणि भ्रम यांसारख्या समस्यांना कारणीभूत ठरतो. अनुवांशिक कारणांमुळे होण्याचा धोका 60-80 टक्के लोकांमध्ये जास्त असतो. याशिवाय जास्त ताण, धक्का, अपघात, सामाजिक दबाव आणि इतर समस्यांमुळेही हा आजार होऊ शकतो. रासायनिक बदल किंवा मेंदूतील कोणत्याही प्रकारची दुखापत आजाराचे कारण बनू शकते. या आजारात भावनांमध्ये आणि वागण्यात बदल होतात. त्यामुळे अनेकवेळा त्यांना सामान्य जीवन जगण्यात अडचणी येतात. आणि काही वेळा त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागते. दुसरीकडे, स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांना योग्य उपचार न मिळाल्यास सुमारे २५ टक्के रुग्णांना आत्महत्या करण्याचा धोका असतो. स्किझोफ्रेनियाची लक्षणे, चिन्हे आणि परिणाम प्रत्येक रुग्णामध्ये वेगवेगळे असू शकतात.

हेही वाचा -Ultra-processed foods : अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांचे सेवनामुळे लठ्ठ होण्याचे प्रमाण जास्त : संशोधन

काय सांगते संशोधन

अमेरिकेतील बेलर कॉलेज ऑफ मेडिसिनमधील मानसोपचार आणि वर्तणूक विज्ञानाचे सहयोगी प्राध्यापक, अँथनी डब्ल्यू. जोगबेन यांनी नमूद केले की, संशोधनामुळे स्किझोफ्रेनियाच्या अनुवांशिकतेवर नवीन गोष्टी समोर आल्या आहेत. त्यांनी अभ्यासाचे परिणाम या समस्येवर प्रभावी उपचार ठरतील. कारण संशोधनाचे परिणाम न्यूरोसायकियाट्रिक विकारांच्या अनुवांशिक जोखमीची ओळख करून देतात. या संशोधनात स्किझोफ्रेनियाचे 112 गंभीर रुग्ण आणि मध्यम लक्षणे असलेल्या 218 रुग्णांवर तपासणी करण्यात आली. यांच्या चाचणीच्या परिणामांची तुलना 5000 लोकांच्या परिणामांशी केली गेली. गंभीर लक्षणे असलेल्या एकूण सहभागींपैकी, 48% लोकांच्या जनुकामध्ये दुर्मिळ आणि प्राणघातक उत्परिवर्तन होते.

स्किझोफ्रेनियाचे 25 दशलक्षाहून अधिक रुग्ण

स्किझोफ्रेनियाने ग्रस्त लोकांच्या आकडेवारीबद्दल सांगायचे तर, विविध वेबसाइट्सवर उपलब्ध माहितीनुसार, जगभरात स्किझोफ्रेनियाचे 25 दशलक्षाहून अधिक रुग्ण आहेत. हा रोग 1000 पैकी 10 लोकांमध्ये दिसून येतो. त्याच वेळी, भारतात विविध प्रकारच्या स्किझोफ्रेनिया पीडितांची संख्या 40 लाखांहून अधिक आहे.

हेही वाचा -Avoid High Cholestrol Problem : निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून उच्च कोलेस्टेरॉलपासून रहा मुक्त

ABOUT THE AUTHOR

...view details