हैदराबाद :ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला माता गायत्रीची जयंती साजरी करण्यात येते. गायत्री जयंती देशभरातील महिला साजरी करतात. माता गायत्रीला परब्रम्हस्वरुपिणी असे संबोधले जाते. माता गायत्रीला वेद माता आणि जगत माताही संबोधले जाते. त्यामुळे कदी आहे गायत्री जयंती, काय आहे गायत्री जयंतीचे महत्व आणि इतिहास याबाबतची माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
कधी आहे गायत्री जयंती :पृथ्वी तलावरील प्रत्येक जीवांमध्ये माता गायत्रीचा वास असल्याचे शास्त्रांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे माता गायत्रीला सगळ्या शक्तीचा आधार मानले जाते. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला माता गायत्रीची जयंती साजरी करण्यात येते. त्यामुळे देशभरात माता गायत्रीची या दिवशी पूजा करण्यात येते. यावर्षी गायत्री जयंती 31 मे रोजी आहे. विशेष म्हणजे या दिवशी निर्जला एकादशी असल्याचे व्रतही करण्यात येणार आहे. त्यामुळे यावर्षी गायत्री जंयतीच्या दिवशी चांगलेच योग जुळून आल्याचे बोलले जाते.
कधी आहे गायत्री जयंतीचा मुहुर्त :यावर्षी गायत्री जयंती 31 मे रोजी येत असल्याने या दिवशी अनेक योग जुळून येत आहेत. त्यामुळे गायत्री जयंतीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या दिवशी गायत्री मंत्राचा जप केल्याने बुद्धीमध्ये वृद्धी होऊन यशस्वी होत असल्याचे शास्त्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गायत्री मंत्राचा उच्चार करण्याचे शास्त्रात नमूद करण्यात आले आहे. यावर्षी गायत्री जयंतीच्या पूजा मुहुर्त 30 मे रोजी दुपारी 1 वाजून 7 मिनीटाने सुरू होत आहे. तर दुसऱ्या दिवशी 31 मे रोजी दुपारी 01 वाजून 45 मिनीटाने हा मुहुर्त समाप्त होत आहे.
काय आहे गायत्री जयंतीचे महत्व :विश्वाचे निर्माता ब्रम्हाने गायत्री मातेची आराधना करुन आपल्या चारी मुखाने गायत्री मंत्राचा जप केला. त्यामुळे गायत्री माता अवतरीत झाल्याने त्यांना वेदमाता असे संबोधले जात असल्याची अख्यायिका पुराणात सांगितली जाते. गायत्री मंत्राला चार वेदांचा सार असल्याची मान्यता आहे. गायत्री संहितेनुसार माता सरस्वती, माता लक्ष्मी आणि माता कालीचे गायत्री माता प्रतिनिधीत्व करतात. या तिन्ही शक्तीमधून वेदाची उत्पत्ती झाल्याने गायत्री मातेला वेदमाता संबोधण्यात येते. त्यामुळे शिक्षण प्राप्त करण्यासाठी गायत्री जयंतीचे महत्व अध्यात्म आणि शिक्षण घेणाऱ्यांसाठी खून मोलाचे आहे. गायत्री मंत्राचा जप केल्याने बौद्धीक विकास होत असल्याचे पुराणात नमूद करण्यात आले आहे. गायत्री मंत्रामुळए मानसिक शांती मिळून मन एकाग्र होते. त्यामुळे गायत्री जयंतीला खूप मोठ्या प्रमाणात महत्व प्राप्त होते.
हेही वाचा - Narasimha Jayanti 2023 : कधी आहे नरसिंह जयंती; काय आहे महत्व, जाणून घ्या...