हैदराबाद :फंगल इन्फेक्शनने (Fungal Infection) त्रस्त असणाऱ्यांची संख्या काय कमी नाही. फंगल इन्फेक्शन खूप सामान्य आहे. जेव्हा फंगल थेट तुमच्या शरीरावर आक्रमण करतो तेव्हा मानवांमध्ये फंगल इन्फेक्शन (suffering from fungal infection) होते. बऱ्याचदा तुमची रोगप्रतिकारक शक्ती तुम्हाला त्या इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी पुरेशी मजबूत नसेल. हे एक इन्फेक्शन आहे. यामध्ये डर्माटोफाइट्स आणि यीस्ट ठळकपणे आढळतात.
फंगल इन्फेक्शन (Fungal Infection) : फंगल मृत केरॅटिनमध्ये वाढतात आणि हळूहळू आपल्या शरीराच्या अशा ठिकाणी पसरतात जिथे थोडासा ओलावा असतो. जसे की - पायाची बोटे, टाच, नखे, गुप्तांग, स्तन इत्यादी. फंगल इन्फेक्शनने त्रस्त असणाऱ्यांची संख्या काय कमी नाही. शरीराच्या कोणत्याही भागात होणारे हे फंगल इन्फेक्शन एका काळानंतर हैराण करून सोडते. मात्र ते का होते? काय काळजी घेऊ शकतो? याबाबत आज पाहुयात...
फंगल इन्फेक्शनचे कारणे काय? (causes of fungal infections) :उष्ण आणि दमट वातावरणामुळे ही समस्या होते. ओले कपडे घालणे. वैयक्तिक स्वच्छतेची काळजी न घेणे. ज्या लोकांना खूप घाम येतो त्यांना फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. खुप वेळ मोजे घालणे. घट्ट शूज किंवा कपडे घालणे. कमजोर रोगप्रतिकार शक्ती. प्रतिजैविक औषधांचे दुष्परिणाम.