महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचे करा सेवन - शरीर तापमान मेन्टेन पदार्थ

हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी काही अन्न पदार्थ फायदेशीर ठरू शकतात. त्यांचे सेवन केल्याने शरीराला उष्णता मिळण्याबरोबरच तुम्हाला थंडीपासून देखील बचाव होण्यास मदत मिळू शकते.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Dec 21, 2021, 5:38 PM IST

Updated : Dec 21, 2021, 8:11 PM IST

हिवाळ्यात थंडीमुळे शरीर केवळ हुडहुडतच नव्हे तर, त्याचे तापमानही कमी होते. अशा काळात शरीराला योग्य ते तापमान राखून ठेवणे गरजेचे आहे. शरीराला उबदार ठेवण्यासाठी काही अन्न पदार्थ फायदेशीर ठरू शकतात. त्यांचे सेवन केल्याने शरीराला उष्णता मिळण्याबरोबरच तुम्हाला थंडीपासून देखील बचाव होण्यास मदत मिळू शकते.

शरीराला उबदार ठेवण्यासाठी किंवा तपामान मेन्टेन ठेवण्यासाठी पुढील पदार्थ फायदेशीर ठरू शकतात.

1) मध - मधमाशांपासून निर्मित मधाचा गोडवा तुम्ही चाखलाच असावा. त्यास निसर्गाचे वर्दानच म्हणावे लागेल. मधाचा वापर आपण स्वयंपाकात करतो. सर्दी, खोकला कमी करण्यासाठी देखील मधाचे सेवन केले जाते. मधाचे गुणधर्म हे उष्ण असून त्याचे सेवन शरीराला गरम ठेवण्यात मदत करू शकते.

मध

2) ड्राय फ्रुट्स - सुकामेवा जसे बदाम, काजू, मनुका सारखे मेवे खाऊन तुम्ही शरीर गरम ठेवू शकता. सुक्यामेव्यांमध्ये प्रथिने ( protein ), कॅल्शियम, लोह ( iron ), मॅग्नेशियम, विटामिन्स आणि इतर पोषक तत्व असतात. सुकामेवा वजन वाढवण्यात देखील मदत करू शकते.

ड्राय फ्रुट्स

3) आले - आले शरीराला गरम ठेवण्यास मदत करू शकते. आले हे एक अँटिऑक्सिडेंट असून ते अ‍ॅलर्जी, सर्दी, खोकला, खराब पचन या समस्यांना दूर करण्यास मदत करू शकते. आल्याच्या चहाचे सेवन शरीराला उबदार ठेवण्यात फायदेशीर ठरू शकते.

आले

4) हळद - आयुर्वेदात हळदीला खूप महत्व आहे. तिचा चवीसाठी स्वयंपाकातही वापर होतो. हळद ही अँटिऑक्सिडेंट असून ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करते, तसेच सर्दी, खोकल्यावर उपचार म्हणून देखील तिचा वापर होतो. एक कप दुधात अर्धा चम्मच हळद टाकून पिल्याने गरम वाटेल.

हळद

5) तिखट मिर्ची -तिखट हिरव्या मिर्चीचे सेवन केल्याने शरीराचे तापमान वाढते. तिचा तिखटपणा हा शरीराला उब देण्यास मदत करतो. मिर्ची ही जेवणात झणझणीतपणा आणतेच, त्याचबरोबर ती हिवाळ्यात देखील शरीराचे तापमाण वाढवण्यास मदत करू शकते.

मिर्ची

6) कांदा -कांद्याशिवाय अन्न पदार्थांचा विचारच करता येणार नाही. त्याच्यामुळे जेवणाला चव मिळते. याचबरोबर कांदा हा शरीराचे तापमान मेन्टेन ठेवण्यास मदत करते. त्यामुळे, हिवाळ्यात कांद्याचे सेवन करायला काही हरकत नाही.

कांदा

हेही वाचा -हिवाळ्यात त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी 'हे' उपाय ठरू शकतात फायदेशीर

Last Updated : Dec 21, 2021, 8:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details