महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Winter skin care tips : हिवाळ्यामध्ये त्वचेचा सॉफ्टनेस कमी झाला? तर मग फाॅलो करा 'या' टिप्स - लॅव्हेंडर तेल

हिवाळ्यामध्ये त्वचेचा सॉफ्टनेस कमी होतो आणि त्यामुळे त्वचा निर्जीव आणि निस्तेज होऊ लागते. ज्यांची त्वचा आधीपासूनच कोरडी आहे त्यांच्यासाठी तर हा ऋतू आणखीच समस्या निर्माण करतो. त्यामुळे या ऋतूत त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. या समस्या टाळण्यासाठी थंडीच्या दिवसात खाली दिलेल्या टिप्स फाॅलो करा. (Winter skin care tips)

follow this tips for soft skin in winter
हिवाळ्यामध्ये त्वचेचा सॉफ्टनेस कमी झाला? तर मग फाॅलो करा 'या' टिप्स

By

Published : Dec 2, 2022, 4:05 PM IST

हैदराबाद :हिवाळ्यामध्ये त्वचेचा सॉफ्टनेस कमी होतो आणि त्यामुळे त्वचा निर्जीव आणि निस्तेज होऊ लागते. ज्यांची त्वचा आधीपासूनच कोरडी आहे त्यांच्यासाठी तर हा ऋतू आणखीच समस्या निर्माण करतो. त्यामुळे या ऋतूत त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. या समस्या टाळण्यासाठी थंडीच्या दिवसात खाली दिलेल्या टिप्स फाॅलो करा. (Winter skin care tips)

त्वचा सुधारण्याचा प्रयत्न करू शकता :तुम्ही आंघोळीच्या पाण्यात काही गोष्टी मिसळून काही प्रमाणात त्वचा सुधारण्याचा प्रयत्न करू शकता. त्वचा वेगळ्या प्रकारे चमकेल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे पदार्थ तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरात सहज शोधू शकता.

1. पाण्यात थोडे गुलाबपाणी टाकावे :गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये असे गुणधर्म असतात, जे त्वचेला आतून दुरुस्त करण्याचे काम करतात. अनेक ब्रँड्सचे गुलाबजल बाजारात उपलब्ध असेल. आंघोळ करण्यापूर्वी पाण्यात थोडे गुलाबपाणी (Rose water) टाकावे. तुम्ही ही पद्धत दररोज वापरून पाहू शकता.

2. पाण्यात 1 चमचा मीठ टाकावे लागेल :तज्ज्ञांच्या मते, आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्याने त्वचेवर घाण आणि धूळ सहज निघू शकते. यासाठी आंघोळ करताना पाण्यात 1 चमचा मीठ टाकावे लागेल. तुम्हाला ही स्किन केअर रेसिपी आठवड्यातून दोनदा ट्राय करावी लागेल.

3. पाण्यात दूध मिसळून आंघोळ करा : हाडे मजबूत करणाऱ्या दुधाने चेहरा स्वच्छ करता येतो. त्वचा गुळगुळीत आणि मुलायम बनवण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात दूध मिसळून आंघोळ करा. तुम्ही ही रेसिपी आठवड्यातून दोनदा करून पहावी आणि ती वापरल्यानंतर शरीराला साध्या पाण्याने नक्कीच स्वच्छ करा.

4. ओट्स वापरू शकता :अंगावर खाज सुटणे किंवा लाल पुरळ दिसल्यास ओट्स वापरू शकता. सुती कापडात किंवा स्टॉकिंग्जमध्ये ओट्स भरून एक गाठ बनवा. आंघोळीच्या पाण्यात काही वेळ भिजवून नंतर आंघोळ केल्याने त्वचेला दाहक-विरोधी गुणधर्म मिळतील.

5. पाण्यात काही थेंब लॅव्हेंडर तेल मिसळून आंघोळ करा : आवश्यक तेले अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. विशेषतः त्वचा आणि केसांसाठी. याशिवाय ते मूडही चांगला आणि हलका ठेवतात. त्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात काही थेंब लॅव्हेंडर तेल मिसळून आंघोळ करा. दिवसभर अंगातून सुगंध येत राहील. तसे, हे तेल वेदना किंवा सूज दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहे.

6. असे बॉडी लोशन वापरा:हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव होऊ शकते. या वारावरणात चेहऱ्यावरच नाहीतर संपूर्ण शरीरावर चांगल्या बॉडी लोशनचा किंवा मॉयश्चरायझरचा (Use of Body Lotion) वापर करणे आवश्यक असते. बॉडी लोशन त्वचेसाठी एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे काम करते. परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बॉडी लोशनचा वापर करणे आवश्यक असते. जर स्किन ड्राय होत असेल तर अशा बॉडी लोशनचा वापर करा ज्यामध्ये दूध आणि ग्लिसरीन मुबलक प्रमाणात असेल.

ABOUT THE AUTHOR

...view details