लिपस्टीक ही महिलांनसाठी अतिशय गरजेच्या वस्तूंपैकी एक असते. कुठेही बाहेर जायचे म्हटले की, ओठांवर लिपस्टीक फिवून आपण झटपट तयार होतो आणि निघतो. लिपस्टीक ही अतिशय आवडीची गोष्ट असते. ज्यांना लिपस्टीक आवडते त्यांच्या पर्समध्ये एखादी तरी लिपस्टीक असतेच. हे ठेवण्या मागचे कारण म्हणजे लिपस्टीक जास्त काळ टिकत नाही, मग खूप बोलणे झाले किंवा खाणे-पिणे झाले की पुन्हा लिपस्टीक गेलेली असते. त्यामुळे आपल्याला सतत लक्ष ठेवून टच अप करत राहावे लागते. आपण ऑफिसला किंवा कुठल्याही कार्यक्रमाला लिपस्टिक (makeup tips) लावून गेल्यानंतर सुरूवातीचे 1- 2 तास लिपस्टिक चांगली राहते, पण त्यानंतर मात्र फिकी होत जाते. लिपस्टिक लाँगलास्टिंग (long lasting lipstick) रहावी यासाठी या काही खास टिप्स फॉलो (how to apply lipstick properly) करा.
Beauty Tips : लिपस्टिक लाँगलास्टिंग रहावी यासाठी 'या' काही खास टिप्स करा फॉलो - लिपस्टिक
लिपस्टिक हा आता बऱ्याच जणींच्या डेली मेकअपचा एक भाग झाला आहे. ज्याप्रमाणे केस विंचरल्या जातात, रोज पावडर, काजळ लावल्या जाते, त्याचप्रमाणे आता रोज लिपस्टिकही लावली जाते. आपण ऑफिसला किंवा कुठल्याही कार्यक्रमाला लिपस्टिक (makeup tips) लावून गेल्यानंतर सुरूवातीचे 1- 2 तास लिपस्टिक चांगली राहते, पण त्यानंतर मात्र फिकी होत जाते. लिपस्टिक लाँगलास्टिंग (long lasting lipstick) रहावी यासाठी या काही खास टिप्स फॉलो करा.
![Beauty Tips : लिपस्टिक लाँगलास्टिंग रहावी यासाठी 'या' काही खास टिप्स करा फॉलो long lasting lipstick](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16790377-thumbnail-3x2-lipstick.jpg)
या काही खास टिप्स फॉलो करा: आपण साधारणपणे मॅट प्रकारातील लिपस्टीक नेहमीसाठी वापरतो. ही लिपस्टीक लावून आपण काही खाल्ले किंवा प्यायले तर लगेचच ती लिपस्टीक निघून जाते. अशावेळी लिपस्टीक लावल्यानंतर त्यावर थोडीशी कॉम्पॅक्ट पावडर लावली तर ती लिपस्टीक अजिबात निघत नाही आणि ती ट्रान्सफर प्रूफ होते. लिपस्टीक आहे त्यापेक्षाही मॅट फिनिशिंग असल्यासारखी दिसते. लिपस्टिक अधिक वेळापर्यंत टिकावी अशी इच्छा असेल तर तिला फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजमध्ये ठेवलेली लिपस्टिक लावल्याने ती अधिक काळ टिकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लिपस्टिक खरेदी करताना चांगली कंपनी निवडा. यावर ही लिपस्टिक टिकणे अवलंबून असते. खूप ऑयली जेवण जेवल्यावर लिपस्टीक थोडी फिकट होते पण ती नेहमीसारखी खूप जास्त निघून जात नाही. तुम्ही लिपस्टीक लावून काही खाल्ले किंवा प्यायले नाही तर साधारण 6 ते 7 तास तुमची लिपस्टीक छान टिकून राहते. इतकेच नाही तर साध्या ब्रँडची स्वस्तातील लिपस्टीक असेल तरीही तुम्ही ही ट्रीक नक्की वापरु शकता.
लिपस्टिक लावण्याच्या आधी अनेक जणी ओठांवर लिपबाम लावतात. जर लिपबाम कमी किंवा जास्त झाला तरीही लिपस्टिकची शेड बदलू शकते. त्यामुळे लिपस्टिक लावण्याच्या आधी ओठांवर लिपबाम जरूर लावा, पण तो खूप जास्त नको. लिपस्टिक लावताना दोन कोट लावा. पण ते कोट लावण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे. यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला जो हवा तो कोट ओठांवर लावून घ्या. यानंतर दोन्ही ओठांमध्ये टिशू पेपर ठेवा आणि दोन्ही ओठांनी त्यावर दाब द्या. बाजारात ट्रान्सफर प्रूफ लिपस्टीक या प्रकारातील लिपस्टीक मिळतात. या लिपस्टीक लगेच जात नाहीत त्यामुळे तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला किंवा समारंभाला हजेरी लावायची असेल तर अशा प्रकारची लिपस्टीक तुम्ही आवर्जून घेऊ शकता.