पर्थ : जगभरातील २० टक्के नागरिकांच्या शरीरात तिव्र वेदना होतात. मात्र या वेदनेचा एखाद्या व्यक्तीच्या जीवनपद्धतीसह मानसिक आरोग्यावर तिव्र परिणाम होण्याची शक्यता असते. ऑस्ट्रेलियातील एडिथ कोवान युनिव्हर्सिटी (ECU) च्या संशोधनात तीव्र वेदना एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात व्यत्यय आणत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या वेदना व्यक्तीच्या मानसिक आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका ठरत असल्याचा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.
जीवनपद्धतीवर वेदनेचे गंभीर परिणाम :व्यक्तीला असलेल्या तिव्र वेदनेमुळे त्यांची जीवनपद्धतीवर गंभीर परिणाम होत असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. याबाबत एडिथ कोवान युनिव्हर्सिटीच्या संशोधक तारा स्विंडेल्स आणि प्राध्यापक जोआन डिक्सन यांनी 300 पेक्षा जास्त नागरिकांचे सर्वेक्षण केले आहेत. या सर्वेक्षणात कर्करोगाशी संबंधित नसलेल्या मात्र तीव्र वेदना असलेल्या नागरिकांचा समावेश होता. यावेळी सहभागी झालेल्या नागरिकांनी त्यांच्या वेदनेची तीव्रता मानसिक आरोग्यावर किती परिणाम करते, याविषयी मत व्यक्त केले. त्यासह त्यांच्या दैनंदिन व्यवहारात वेदनेमुळे किती त्रास सहन करावा लागतो या प्रश्नांचीही उत्तरे दिल्याचे या संशोधकांनी यावेळी स्पष्ट केले आहे.