हैदराबाद : इंटरनेट हे माहितीचे महाजाल आहे. त्यामुळे इंटरनेटवर दिवसभरात मोठ्या प्रमाणात माहितीचे भांडार अपलोड करण्यात येते. मात्र या माहितीची सत्यता किती असते, याबाबत कोणतीही शाश्वती देता येत नाही. त्यामुळे इंटरनेटवर असलेल्या माहितीची उलट तपासणी होणे गरजेचे असते. त्यासाठी इंटरनेटवर अनेक फॅक्ट चेकींग साईट उपलब्ध आहेत. मात्र याबाबत जनजागृती करण्यासाठी एप्रिल महिन्यातील दुसरा दिवस आंतरराष्ट्रीय फॅक्ट चेकींग डे साजरा करण्यात येतो.
काय आहे फॅक्ट चेकींग डेचा इतिहास :सध्या अनेक प्रकारच्या जाहिरातीतून चुकीची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे या माहितीची सत्यता पडताळणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी या माहितीचे मूळ काय आहे, त्याची सत्यता कशी पडताळायची याबाबतची माहिती घेऊन त्या चुकीच्या माहितीची पडताळणी करणे गरजेचे असते. याची सुरुवात 1850 मधील वृत्तपत्रात याबाबतची गरज प्रकर्षाने जाणवली होती. त्यासाठी कोलीन डिक्की यांनी ही पद्धत शोधून काढली आहे. त्यांनी या माहितीतील मुख्य घटक काय आहे, त्याचा शोध कसा घ्यावा याबाबतची माहिती शोधून काढली. त्यानंतर राल्फ पुलित्झर यांनी 1912 मध्ये या पद्धतीला आणखी विकसित केले. हेन्री लुईस यांनी मूळ टायटलवर फॅक्ट चेकींग शोधून काढण्याचे तंत्र विकसित केले. त्यांचा फॅक्ट चेकींग विभाग चांगलाच नावाजलेला होता.
काय आहेत फॅक्ट चेकींगचे प्रकार :आपल्याला मिळालेली माहिती खरी आहे की नाही याबाबतची पडताळणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी फॅक्ट चेकींग करणे गरजेचे आहे. त्यामुळे फॅक्ट चेकींगचे किती प्रकार आहेत, याबाबतची माहिती घेणे गरजेचे आहे. फॅक्ट चेकींगचे मूळ दोन प्रकार करण्यात येत असल्याची माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञ देतात. यात अँटी होक फॅक्ट चेकींग आणि पोस्ट होक फॅक्ट चेकींग या दोन प्रकाराचा समावेश करण्यात येतो. यातील अँटी होक फॅक्ट चेकींग ही खोट्या माहितीचा प्रसार होण्यापूर्वी त्यातील खरी माहिती शोधून नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येते. या माहितीला नागरिकांपर्यंत जाण्यास रोखण्यातही येते. तर दुसऱ्या प्रकारात पोस्ट होक फॅक्ट चेकींग या प्रकारात एखाद्या मिळालेल्या माहितीवर अहवाल सादर करण्यात येते. या अहवालातून मिळालेली किंवा प्रसारित होत असलेली माहिती कसी चुकीची आहे, याबाबतचा तपशील जोडण्यात येतो. त्यासाठी कधी कधी फोटो, व्हिडिओ आणि पुराव्याचेही नमुने सोबत जोडलेले असतात. सध्या अनेक फॅक्ट चेकींग साईटवर चुकीच्या माहितीबाबत फॅक्ट चेकींग करण्यात येते. विशेष म्हणजे राजकारणात अनेक नेत्यांविरोधात सोशल माध्यमातून चुकीच्या माहितीवर प्रचार करण्यात येतो. अशावेळी फॅक्ट चेकींग फार महत्वाचे असल्याचे दिसून येते.
हेही वाचा - World Autism Awareness Day 2023 : भारतात दरदिवशी 8 जण होतात ऑटिझमचे शिकार ; जाणून घ्या काय आहेत या आजाराची लक्षणे