हैदराबादEyelash Growing Tips : प्रत्येक स्त्रीला लांब आणि जाड पापण्या असाव्यात असं वाटत असतं. लांब आणि चमकणाऱ्या पापण्या तुमच्या चेहऱ्याला एक वेगळंच आकर्षण देतात. यामुळेच आजकाल स्त्रिया लग्न किंवा मोठ्या समारंभाला जाण्यापूर्वी डोळे अधिक आकर्षक बनवण्यासाठी बनावट पापण्यांचा अवलंब करत आहेत. आजकाल अनेक कृत्रिम उपचार आहेत. ज्याद्वारे पापण्या लांब आणि जाड केल्या जातात. मात्र हे सर्व प्रकारचे उपचार फार काळ टिकत नाहीत, तसंच काहीवेळा त्यांचे डोळ्यांवर दुष्परिणामही झालेले दिसून आले आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही तुमच्या पापण्या जाड आणि लांब करायच्या असतील, तर या लेखात आम्ही तुम्हाला काही प्रभावी उपाय सांगणार आहोत. या पद्धतींच्या मदतीने तुम्ही तुमचे लांब पापण्यांचे स्वप्न कोणत्याही दुष्परिणामांशिवाय अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल.
ग्रीन टी चमत्कार करेल :स्टाइलक्रेसच्या मते ग्रीन टीमध्ये पॉलिफेनॉल भरपूर प्रमाणात असतं, जे केसांच्या वाढीसाठी प्रभावी ठरतं. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी थंड करून बोटांनं पापण्यांवर लावा. असं नियमित केल्यानं तुमच्या पापण्या काही वेळातच लांब आणि जाड होतील. याशिवाय तुम्ही ग्रीन टीचं सेवन करू शकता. याच्या मदतीनं पापण्यांसोबतच तुमच्या डोक्याचे केस वाढवण्यासाठी ते प्रभावी ठरेल.
एरंडेल तेल उपयुक्त :पापण्यांच्या वाढीसाठी एरंडेल तेल हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. एरंडेल तेलामध्ये रिसिनोलिक ऍसिड असतं. त्यामध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो. हे पापण्यांच्या फोलिकल्सचे पोषण करण्याचे काम करतात. याशिवाय व्हिटॅमिन ई, ओमेगा-6 फॅटी ऍसिड सारखे इतर अनेक पोषक घटक देखील एरंडेल तेलात भरपूर प्रमाणात आढळतात. ते पापण्यांच्या वाढीसाठी प्रभावी ठरतात. यासाठी तुम्ही कापसावर थोडंसं एरंडेल तेल घेऊ शकता किंवा बोटांच्या मदतीने डोळ्यांना लावू शकता.