निरोगी शरीर आणि मनासाठी सर्व वयोगटातील पुरुष आणि स्त्रियांसाठी नियमित व्यायाम आवश्यक आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की, लोकांनी रोज 1 ते 2 तासांपर्यंत कडक व्यायाम केला पाहिजे. रोज हल्का व्यायाम ज्यात स्नायूंची स्ट्रेचिंग होईल इतकेही फायदेशीर ठरते. नियमित व्यायाम केल्याने शरीराला काय फायदे होतात? याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत सुखीभव'ने फिटनेस तज्ज्ञ मीनू वर्मा यांच्याशी बातचित केली.
नियमित व्यायामाचे फायदे
- व्यायामाने शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती बळकट होते.
- स्नायू निरोगी राहतात, त्याचबरोबर शरीरात रक्ताभिसरण (blood circulation) देखील चांगल्या प्रकारे होते.
- नियमित व्यायाम केल्याने रक्तदाबासंबंधी समस्या कमी होतात आणि रक्तदाब नियंत्रित राहते.
- वजनाला नियंत्रित करण्यासाठी आवश्यक चयापचय क्रियेला निरोगी राखण्यासाठी नियमित व्यायाम उपयोगी ठरतो. याने कॅलरी देखील वेगाने बर्न होतात आणि वजन नियंत्रणात राहाते.
- नियमित व्यायामाने तनाव, डोकेदुखी आणि अवसाद यांसारख्या अनेक समस्यांना कमी किंवा बरे केले जाऊ शकते.
- ज्या लोकांना पाठ आणि हाथ-पाय दुखण्याची समस्या होते आणि शरीरात सतत अशक्तपणा जाणवतो अशांना देखील व्यायामाचा फायदा होतो.
- व्यायामाने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी देखील सामान्य केली जाऊ शकते. नियमित व्यायामाने हानिकारक कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते आणि चांगल्या कोलेस्टेरॉलची मात्रा वाढते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहाते आणि आपल्याला अधिक प्रमाणात ऑक्सिजन घेता येते.
कधी आणि कोणता व्यायाम चांगला
मीनू वर्मा सांगतात की, रात्री एवजी सकाळी व्यायाम करणे जास्त फायद्याचे असते. यावेळी व्यायाम केल्याने शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात आणि भरपूर प्रमाणात ऑक्सिजन घेतली जाऊ शकते. शक्य असल्यास व्यायामासाठी सकाळी एक वेळ निश्चित केली पाहिजे. यासाठी सामान्यत: सूर्योदय किंवा लगेच त्याआधीची वेळ योग्य असते. कोणताही व्यायाम सुरू करण्याआधी एखाद्या तज्ज्ञ किंवा जाणकाराची मदत घ्या आणि योग्य व्यायाम कसा करायचा ते शिका. चुकीच्या पद्धतीने केलेला व्यायाम शरीराला नुकसान पोहचवू शकतो. व्यायाम करण्याचे बरेच माध्यम असू शकतात जसे योग, एरोबिक्स, झुम्बा, खेळ, नृत्य किंवा जीम इत्यादी. तुम्हाला आवडेल अशी व्यायामाची पद्धत निवडा जी केल्याने तुम्हाला आनंद मिळेल.
ऑफिसमध्येही व्यायाम शक्य
काम करणारे लोकं विशेषत: नियमित कार्यालयात जाणाऱ्या लोकांना एक दिनक्रम तयार करून व्यायाम करणे सोपे नसते. मात्र, ऑफिसात तासनतास बसून काम केल्याने त्यांचे डोळे, खांदे, बोटं, पाय, मान आणि शरीराच्या भागांमध्ये वेदना होऊ लागतात. मीनू वर्मा सांगतात की, अशा अवस्थेत काही विशिष्ट सवयी स्वीकारल्या जाऊ शकतात ज्यांचा शरीरावर व्यायामासारखाच प्रभाव पडतो. त्याचबरोबर, काही हल्के व्यायाम देखील असतात जे ऑफिसमध्ये बसून आरामाने केले जाऊ शकतात. ते पुढील प्रकारचे आहेत,
- ऑफिस आणि घर कुठेही चढण्या उतरण्याची गरज असल्यास शक्य असल्यास जिन्याचा वापर करावा.
- कामादरम्यान खुर्चीवर बसले असल्यास काही वेळ काढून पायांच्या टाचांना जमिनीवरून वर उचला आणि नंतर हळू हळू जमिनीवर परत ठेवा. या प्रक्रियेची 8-10 वेळा पुनरावृत्ती केली जाऊ शकते आणि या व्यायामाला दिवसातून दोनपेक्षा अधिक वेळा देखील केले जाऊ शकते.
- खुर्चीवर बसल्या बसल्या आपले खांदे शक्य असेल तेवढे उंच उचला, त्याचबरोबर खांदे आधी समोर आणि नंतर मागे घडीच्या सुईच्या दिशेने फिरवा.
- जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल आणि तुम्ही खुर्चीवर बसले असाल तर आधी सरळ उभे व्हा आणि नंतर कंबर सरळ ठेवून बसा. लक्षात ठेवा या व्यायामात कंबर सरळ राहिली पाहिजे. या व्यामाची दिवसातून 10 ते 15 वेळा एकाच वेळी आणि दिवसातून 1 ते 3 वेळा तुमच्या सोयीनुसार पुनरावृत्ती केली जाऊ शकते.
- खुर्चीवर बसले असताना आपल्या पायांचे पंजे मधा मधात खोला आणि बंद करत राहा, तसेच हातांची देखील मुठ्ठी बनवून ती खोला आणि बंद करत राहा.
- डोळ्यांच्या व्यायामासाठी खुर्चीवर बसले असताना डोळ्यांना 360 डिग्रीच्या कोनात फिरवा. असे तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा आपल्या सोयीनुसार करू शकता. या व्यतिरिक्त पेन किंवा बोटाला काही वेळ खांद्याच्या सरळ दिशेने (aligned to your shoulder) ठेवा आणि नंतर त्यास उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे फिरवा. यादरम्यान तुमचे डोळे हे त्या वस्तूवरच केंद्रित असावे.
हेही वाचा -पावसाळ्यात त्वचेची सुरक्षा कशी करावी? तज्ज्ञांनी सुचवले 'हे' उपाय