महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

COVID shrink brain smell regions : कोरोनामुळे मेंदूतील वासाच्या भागावर होतो परिणाम - long covid symptoms

कोरोनाच्या गंभीर प्रकरणांमध्ये मेंदूशी संबंधित विकृती आढळून आल्या. तेव्हा कोरोनामुळे ऊतींचे नुकसान ( tissue damage and greater shrinkage ) होऊ शकते आणि वासाशी संबंधित मेंदूच्या भागात जास्त संकोचन होऊ शकते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 51-81 वयोगटातील 785 लोकांच्या मेंदूमध्ये कोरोनाच्या संसर्गानंतर 4.5 महिन्यांनी पुढील बदल त्यांना आढळून आले.

COVID shrink brain
COVID shrink brain

By

Published : Mar 10, 2022, 7:01 AM IST

कोरोनाच्या गंभीर प्रकरणांमध्ये मेंदूशी संबंधित विकृती आढळून आल्या. तेव्हा कोरोनामुळे ऊतींचे नुकसान ( tissue damage and greater shrinkage ) होऊ शकते आणि वासाशी संबंधित मेंदूच्या भागात जास्त संकोचन होऊ शकते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 51-81 वयोगटातील 785 लोकांच्या मेंदूमध्ये कोरोनाच्या संसर्गानंतर 4.5 महिन्यांनी पुढील बदल त्यांना आढळून आले.

नेचर या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. यात मेंदूच्या (ऑर्बिटोफ्रंटल कॉर्टेक्स आणि पॅराहिप्पोकॅम्पल गायरस) क्षेत्रांमध्ये राखाडी पदार्थाची जाडी कमी होण्यासह अनेक परिणाम नोंदवले गेले.कोरोना झालेल्या रुग्णांना घाणेंद्रियाच्या कॉर्टेक्सशी जोडलेल्या भागात, वासाशी जोडलेले क्षेत्र येथे बदल जाणवले. हे फक्त परिणाम 0.2 ते 2 टक्के अतिरिक्त बदल आहेत.

काय होते निष्कर्ष

वासाच्या संवेदना, जळजळ किंवा मज्जासंस्थेच्या रोगप्रतिकारक प्रतिसादाशी संबंधित होते. संशोधऩात सहभागी 96 टक्के सौम्य संसर्ग असूनही राखाडी पदार्थाचे प्रमाण कमी आणि ऊतींचे मोठे नुकसान पाहिले," असे विद्यापीठातील प्रमुख प्रोफेसर ग्वेनेल डौड यांनी सांगितले. सहभागी लोकांनी कोरोनाची लागण होण्यापूर्वी आणि तसंच नंतर 38 महिन्यांनेसंज्ञानात्मक चाचण्याचे स्कॅनिंग केले. कोरोना झालेल्या लोकांनी दोन स्कॅन्समध्‍ये अधिक संज्ञानात्मक घट दर्शविली.

वृध्द वयात जास्त होतात आजार

यानंतर टीमने कोरोना न झालेल्या, व न्यूमोनियाचा संसर्ग झालेल्या लोकांची चाचणी केली. यात बदल कोविडशी संबंधित आहेत, आणि श्वसनाच्या आजाराच्या सामान्य परिणामांमुळे नाही, असे आढळून आले. जटिल कार्ये करण्यासाठी त्यांच्या मानसिक क्षमतेत देखील मोठी घट दर्शविली आणि ही मानसिक बिघडणे अंशतः या मेंदूच्या विकृतींशी संबंधित आहे," असेही डौड म्हणाले. सर्व नकारात्मक परिणाम वृद्ध वयात जास्त दिलून येतात. हे प्रभाव दीर्घकाळ टिकून राहतात. अधिक गोष्टींसाठी पुढील तपासणीची आवश्यकता आहे, डौड म्हणाले.

हेही वाचा -Resistance exercise : प्रतिरोधक व्यायामाममुळे मिळते चांगली झोप

ABOUT THE AUTHOR

...view details