महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Elon Musk Replaces Twitters Logo : ट्विटरच्या लोगोतून चिमणी उडाली भुर्रर्र... लोगोच्या जागी आला श्वान - ट्विट

एलन मस्क यांनी ट्विटरच्या लोगो बदल केल्याची ट्विट करुन माहिती दिली आहे. ट्विटरच्या जुन्या लोगोत असलेल्या पक्ष्याच्या लोगोच्या जागेवर आता श्वानाचा लोगो लावण्यात आला आहे.

Elon Musk Replaces Twitters Logo
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 4, 2023, 10:50 AM IST

वॉशिंग्टन : एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यापासून विविध बदल सुरू केले आहेत. आता तर त्यांनी ट्विटरच्या लोगोतून चिमणी काढून टाकली असून त्या जागेवर श्वानाचा लोगो लावण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरमध्ये अनेक बदल सुरुच असल्याचे दिसून येत आहे. ट्विटरच्या लोगोतून श्वानाचा लोगो ठेवण्यात आला तो डोगेकॉइन क्रिप्टोकरंसीसारखे असल्याची सध्या टेक जगतात चर्चा आहे. विशेष म्हणजे या लोगोवर 2013 मध्ये चांगलीच चर्चा झाली असून त्याची अनेकांनी खिल्लीही उडवली होती.

एलॉन मस्कने केले मजेदार ट्विट :एलन मस्क यांनी ट्विटरचा लोगो बदलल्यानंतर एक ट्विट केले आहे. हे ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आहे. या पोस्टमध्ये एक श्वान गाडीत बसला असून त्याच्यापुढे एक पोलीस अधिकारी आहे. हा पोलीस अधिकारी त्याच्या परवान्याकडे काळजीपूर्वक पाहत आहे. यावर हा श्वान हा जुना फोटो असल्याचे सांगत आहे. विशेष म्हणजे ट्विटरच्या मोबाईल अ‍ॅपमध्ये कोणताही बदल अद्यापही करण्यात आलेला नाही. श्वानाचा फोटो क्रिप्टोकरन्सी शिबा इनूच्या डोगेकॉइन ब्लॉकचेनसारखाच असल्याची सध्या चर्चा सुरू आहे.

एलॉन मस्कने केले वचन पूर्ण : मस्क यांनी 26 मार्च 2022 चा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये एलन मस्क यांनी एका वापरकर्त्यासोबत संवाद साधला होता. यावेळी त्यांनी बदलाबाबत अनेक प्रश्न त्या वापरकर्त्याला विचारले. यावर वापरकर्त्यांनी क्रिप्टोकरन्सी असलेल्या श्वानाचा लोगो बदलण्याची विनंती केली होती. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी वचन पूर्ण केल्याचे सांगितले आहे.

डोगेकॉइनचे मूल्य 20 टक्क्याने वाढले : मस्क यांनी आपल्या ट्विटरचा लोगो बदलण्याचे ठरवल्याने ट्विटर वापरकर्त्यांना मोठा धक्काच बसला आहे. मात्र एलन मस्क यांनी ट्विटरचा लोगो म्हणून ठेवलेला लोगो हा डॉगेकॉइनवर असलेल्या श्वानासारखाच असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे ए मस्क यांना क्रिप्टोकरंसीमध्ये विशेष रस आहे. एलॉन हे डॉगी मेमचा सुपरफॅन आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी 'सॅटर्डे नाईट लाइव्ह' कार्यक्रम होस्ट करताना मस्क यांनी ट्विटर आणि डॉगेकॉइनची जाहिरात केल्याची चर्चाही करण्यात आली होती. ट्विटरच्या लोगोमध्ये झालेल्या बदलामुळे क्रिप्टोकरन्सी डोगेकॉइनचे मूल्य 20 टक्क्यांहून अधिक वाढल्याचा दावाही करण्यात येत आहे.

हेही वाचा - McDonalds Layoff News : मॅकडोनाल्ड्सचे यूएस कार्यालय तात्पुरते बंद; मोठ्या प्रमाणावर केली टाळेबंदीची तयारी

ABOUT THE AUTHOR

...view details