हैदराबाद: जेवणात तूप वापरल्याने जेवण रूचकर बनते. बर्याचदा लोकांना गरम चपातीवर तूप लावून खायला आवडते. अनेकजण भाजीतदेखील तूप घालून खातात. तूप स्वादिष्ट असण्यासोबतच तुमच्या शरीरासाठीही खूप फायदेशीर आहे. काही लोकांना असे वाटते की तूप खाल्ल्याने वजन वाढते आणि ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. तुम्ही योग्य प्रमाणात तूप खाल्ल्यास त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने आरोग्याच्या समस्यांपासून दूर राहते. जाणून घ्या त्याचे फायदे.
- पचनक्रियेसाठी तूप फायदेशीर असते :ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांच्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी तूप खाणे खूप फायदेशीर ठरते. तुपामुळे बद्धकोष्ठता आणि पोटदुखीपासून आराम मिळतो. तूपामध्ये ब्युटीरिक ऍसिड असते. रिकाम्या पोटी कोमट पाण्यात तूप टाकून पिल्यास पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. हा तुमच्यासाठी एक उत्तम उपाय असू शकतो.
- सांधेदुखी कमी होते :तुपात ओमेगा ३ फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते. रिकाम्या पोटी तूप खाल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. याशिवाय तुपात कॅल्शियमही भरपूर असते, ज्यामुळे हाडे निरोगी राहतात.
- रोग प्रतिकारशक्ती वाढते : तुपात हेल्दी फॅट्स असतात. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म आरोग्यासाठी आवश्यक आहेत. जर तुम्ही नियमितपणे रिकाम्या पोटी गरम पाण्यासोबत एक चमचा तूप खाल्ले तर ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. ज्यामुळे तुम्ही अनेक प्रकारचे आजार होण्यापासून वाचू शकता. आतड्याच्या आरोग्यासाठीही तूप हा उत्तम पर्याय आहे.
- मेंदूला प्रोत्साहन मिळते :तुपातील गुणधर्मांमुळे मेंदूचे आरोग्य वाढते. यामध्ये व्हिटॅमिन-ई असते, जे मेंदूला आजारांपासून वाचवण्यास मदत करते. निरोगी राहण्यासाठी तुम्ही रिकाम्या पोटी तुप खावू शकता.
- त्वचा निरोगी आणि मुलायम राहते : तुपात कॅल्शियम, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-डी आणि इतर अनेक पोषक घटक असतात. जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने सुरकुत्या आणि पिंपल्सपासून देखील आराम मिळतो.
- डोळ्यांसाठी फायदेशीर : तुपात व्हिटॅमिन-ए आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. दररोज तूप खाल्याने दृष्टी सुधारते.