महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 21, 2022, 2:05 PM IST

ETV Bharat / sukhibhava

Lancet Study Report: ड्रग रेझिस्टंट इन्फेक्शन्समुळे वर्षभरात 10 लाख लोकांचा बळी जातो

लॅन्सेटमध्ये प्रकाशित (Published in the Lancet) केलेल्या एका अभ्यासानुसार, प्रतिजैविक प्रतिकारशक्तीमुळे जगभरातील 1 दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो.

DRUG RESISTANT
DRUG RESISTANT

मानव, प्राणी आणि वनस्पती यांच्यामध्ये रोगजनकांमुळे होणारे संक्रमण रोखण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी काही औषधांचा वापर केला जातो. यामध्ये अँटीमायक्रोबियल, अँटीव्हायरल, अँटीफंगल्स आणि अँटीपॅरासायटिक्स यांचा समावेश असतो. अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) म्हणजे जेव्हा शरीरात संसर्ग झालेले हे रोगजनक औषधांना प्रतिसाद देत नाहीत. याचा परिणाम हा रोग जलद पसरू शकतो. त्यामुऴे उपचार करणे कठीण होते. तसेच अगदी प्राणघातक देखील होऊ शकते. दुसऱ्या शब्दांत, एखादी व्यक्ती औषधाला प्रतिरोधक बनते आणि दिलेल्या औषधांचा कोणताही परिणाम होत नाही, त्यामुळे रोगाचा उपचार करणे कठीण होते.

लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या आणि वॉशिंग्टन विद्यापीठातील (University of Washington) इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनच्या (Institute for Health Metrics and Evaluation) संशोधकांच्या नेतृत्वाखालील अभ्यासात असे दिसून आले आहे की, 2019 मध्ये 1.27 दशलक्ष मृत्यू हे औषध प्रतिरोधक बॅक्टेरियाच्या संसर्गाचा थेट परिणाम होते. आणि 4.95 दशलक्ष मृत्यू हे त्यांच्याशी संबंधित होते. त्यामुळे वर्षाला 700,000 मृत्यूंच्या मागील अंदाजापेक्षा तीक्ष्ण उडी दर्शवते. प्रतिजैविक प्रतिकार (AMR) हा 21 व्या शतकात सार्वजनिक आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे. संशोधकांनी सध्या सुरू असलेल्या कोविड-19 साथीच्या आजाराबाबतही अशाच प्रकरची चिंता व्यक्त केली आहे. संशोधकांच्या मते, अनावश्यक प्रतिजैविकांच्या वाढत्या सेवन केल्याने औषधांचा प्रतिकार वाढवू शकते. असा अभ्यास करमनाऱ्या टीमने 2019 मध्ये 204 देश आणि प्रदेशांमध्ये 23 रोगजनक आणि 88 रोगजनक-औषध संयोजनांसाठी रोगांचे ओझे असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

या अभ्यासात समाविष्ट असलेल्या प्रमुख जीवाणूजन्य रोगजनकांपैकी, केवळ न्यूमोकोकल न्यूमोनिया लसीकरणाद्वारे टाळता येऊ शकतो. इन्फ्लूएन्झा, रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस आणि रोटाव्हायरससह विषाणूजन्य रोगजनकांविरूद्ध प्रतिबंधात्मक लसी घेतल्याने (Pathogens Restrictive Lactose) उपचारांची गरज कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. ज्यामुळे अनावश्यक आणि अयोग्य प्रतिजैविकांचा वापर कमी करता येतो.

या अभ्यासातून असेही समोर आले आहे की, AMR-संबंधित मृत्यूंचे ओझे एकूण मृत्युदराचा वाटा म्हणून जगभरात मोठ्या प्रमाणावर बदलतो आहे. तसेच तो पश्चिम आफ्रिकेत सर्वाधिक आहे. त्यानंतर पूर्व आफ्रिका आणि दक्षिण आशिया या भागातआहे. या अहवालात अनेक कमी-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये तसेच मर्यादित चाचणी क्षमता, अयोग्य वापर, अधिक महागड्या आणि आवश्यक औषधांचा अपुरा पुरवठा, अस्वच्छता आणि निकृष्ट आणि बनावट औषधांचा प्रसार यांसारख्या गंभीर आकडेवारीची नोंद करण्यात आली आहे.

IHME मधील ख्रिस्तोफर जे.एल. मरे यांच्यासह संशोधकांनी सांगितले की, एएमआर हे जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. ज्यामध्ये कमी-संसाधन सेटिंग्जमध्ये सर्वाधिक ओझे आहे. एएमआरचे ओझे समजून घेणे आणि त्यात योगदान देणारे प्रमुख रोगजनक-औषध संयोजन महत्त्वपूर्ण आहेत. ते पुढे म्हणाले. संशोधकांनी महत्त्वपूर्ण मानवी आरोग्य धोक्यांची समज सुधारण्यासाठी सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेची क्षमता आणि डेटा संकलन प्रणालीचा विस्तार करण्याच्या गरजेवर भर दिला आहे.

संशोधकाच्या संघाने काही आव्हाने देखील केली आहेत. यामध्ये वाढीव संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण, बॅक्टेरियाच्या न्यूमोनियासह वाढीव लसीकरण, शेतीमध्ये प्रतिजैविकांचा वापर कमी करणे, विषाणूंवर उपचार करण्यासाठी मानवांमध्ये अयोग्य आणि अनावश्यक वापर कमी करणे. तेसेच नवीन बदलणारी औषधे विकसित करण्यासाठी नवीन गुंतवणूक करण्याचे सुध्दा आवाहन केले आहे.

AMR कसे प्रतिबंधित करावे ?

  • आजारी असल्यावर तुम्ही वैद्यकीय सल्ला घ्या. आपणहून स्वत:वर उपचार करु नका. डॉक्टरांनी प्रतिजैविक औषधे लिहून दिली असेल तरच घ्या.
  • तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या औषंधांचा संपूर्ण कोर्स वेळेत पूर्ण करा.
  • उपचांरपेक्षा काळजी घेणे कधीही चांगले, योग्य स्वच्छतेचे पालन करा, हात धुवा, लसीकरण करा आणि तसेच सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा आणि संसर्ग टाळा.
  • अँटिबायोटिक्सचा विषाणूजन्य संसर्गावर काही परिणाम होत नाही. त्यामुळे तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय त्याचा वापर करु नका.
  • जर तुम्हाला असणारी लक्षण समान असतील तर इतर कोणासाठी लिहून दिलेली औषधे वापरु नका.

ABOUT THE AUTHOR

...view details