हैदराबाद :शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी 8-10 ग्लास पाणी पिणे फार महत्वाचे आहे. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते तसेच अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. सकाळी ब्रश न करता पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. चला तर मग जाणून घेऊया ब्रश न करता पाणी पिणे आरोग्यासाठी खरेच चांगले आहे का? काही लोकांना विचारण्यात आले की ब्रश न करता पाणी का प्यावे, तर त्यांनी उत्तर दिले की रात्री साधारण ७-८ तास पाणी शरीरात जात नाही. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी उठून पाणी प्यावे. चला जाणून घेऊया आपण पाणी प्यावे की नाही?
प्रतिकारशक्ती वाढवते :सकाळी दात न घासता पाणी प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक आजारांपासूनही तुमचा बचाव होतो. विशेषत: हिवाळ्यात, जर तुम्हाला खोकला, सर्दी आणि हंगामी आजारांची लक्षणे दिसत असतील तर तुम्ही एक ग्लास कोमट पाणी प्यावे. ब्रश न करता पाणी पिल्याने त्याचा त्वचेवर आणि केसांवर चांगला परिणाम होतो.