महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Health Tips : हिवाळ्यात असे 'हळद-केशर दूध' बनवून प्या, वाढेल रोग प्रतिकारशक्ती

हिवाळा हंगाम सुरू आहे. या ऋतूत केशराचे दूध (drink turmeric saffron milk in winter) प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. त्याच्या वापराने तणाव देखील दूर (it will increase immunity) होतो. याशिवाय लोह, व्हिटॅमिन-सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फोलेट, व्हिटॅमिन-बी6, फॉस्फरस आणि तांबे यांसारखे गुणधर्म केशरमध्ये आढळतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला मौसमी आजार टाळायचे असतील तर केशर आणि हळदीचे दूध (turmeric saffron milk) बनवून ते प्यावे. विशेषत: हिवाळ्यात शरीराला ऊब देण्यासाठी तुम्ही या दुधाचे सेवन करू शकता. चला जाणून घेऊया त्याची रेसिपी-

turmeric saffron milk
हळद-केशर दूध

By

Published : Jan 2, 2023, 11:09 PM IST

हैदराबाद : हळद केशर दूध ( turmeric saffron milk) बनवण्यासाठी लागणारे साहित्य :दूध - 2 ग्लास, केशर - 5-6, हळद - 2 टीस्पून, बदाम - 50 ग्रॅम, गुळ पावडर - 2 टीस्पून, सुंठ पावडर - 1/2 टीस्पून, 2 वेलची.

हळद केशर दूध बनवण्याची कृती (Recipe for making turmeric saffron milk) :प्रथम आपण एका भांड्यामध्ये दूध घाला. यानंतर दूध गरम करा. 4-5 मिनिटांत दूध उकळायला लागल्यावर गॅस बंद करा. नंतर दुधात हळद, केशर, वेलची आणि सुंठ पावडर मिसळा. चमच्याच्या मदतीने सर्व साहित्य दुधात चांगले हलवून घ्या. यानंतर गॅसची आंच मंद करा आणि दूध किमान 5 मिनिटे पुन्हा गरम करा. तुमचे स्वादिष्ट, आरोग्यदायी हळद आणि केशर दूध तयार आहे. बदामाने सजवून सर्व्ह करा. हळद-केशर दूध एकदम थंड म होता ते कोमट असताना प्यावे. त्याने घशाला आराम (drink turmeric saffron milk in winter) देखील मिळेल.

केशरचे फायदे :तुम्ही तुमच्या वाढत्या वजनामुळे त्रस्त असाल तर केशरचे सेवन अवश्य करा. केशर भूक कमी करून कॅलरीजचे प्रमाण कमी करते. यासोबतचकेशर कॉलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी करते. ज्यामुळे, हृदय संबंधित आजार, लठ्ठपणा आणि मधुमेह इत्यादी आजारांचा धोका कमी होतो. डोकेदुखीपासून आराम हवा असल्यास केशर उपयुक्त ठरते. चंदन आणि केशराचा लेप करून तो कपाळावर लावल्याने डोकेदुखीपासून (it will increase immunity) आराम मिळतो.

हळदीचे फायदे : हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो. ही वनस्पती बारमाही मिळते. हळद गरम दुधात टाकून किंवा पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार, मधुमेह, कर्करोग, मेंदुचे विकार होण्यापासुन प्रतिबंध होतो. सध्याच्या वातावरणात दुर्बल प्रतिकारशक्तीमुळे लोकं कोरोनाला बळी पडत आहेत, अशा परिस्थितीत हळद रोगप्रतिकार शक्ती बळकट करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

दुधाचे फायदे :दुधाचे सेवन केल्याने हाडे आणि स्नायू मजबूत होण्यासाठी मदत होते. कारण दुधामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा समावेश असतो. हे दोन्ही घटक हाडांपासून महत्त्वाचे मानले जातात. दूध हाडे मजबूत करून ऑस्टियोपोरोसिस (हाडांचा प्रकार) आणि वृद्धापकाळातील फ्रॅक्चर टाळण्यास मदत करू शकते. दुधात कोलाईनचे प्रमाण खूप असते, त्यामुळे शरीरातील स्नायू बळकट होण्याबरोबरच आपला मूडही चांगला राहतो. थंड दूध प्यायल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येते. तुम्हाला तोंड आले असेल किंवा हिरड्या सुजल्या असतील तर दूध प्यायल्याचा नक्की फायदा होईल आणि त्रास कमी होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details