महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 25, 2020, 12:21 PM IST

ETV Bharat / sukhibhava

तुम्ही दु:खी की नैराश्यग्रस्त आहात?

प्रत्येक गोष्टीतला रस गमावणे, एखाद्याशी बोलण्याची किंवा काही खाण्याची इच्छा न होणे किंवा नेहमी झोप लागणे, निराश वाटणे, दुबळा आणि क्षुल्लक वाटायला लागणे, प्रत्येक भावना नकारात्मक आणि निकृष्ट होत जाणे आदी लक्षणांचा यामध्ये समावेश होतो. ही लक्षणे दीर्घकाळ टिकून राहतात. त्यानंतरच आपण याला डिप्रेसिव्ह डिसऑर्डर असं म्हणतो. परंतु, काहीही करण्यास रस नसणे अशाप्रकारची दु: खाची किंवा नैराश्याची लक्षणं काही काळानंतर दूर होतात.

how to overcome from depression  difference between sad and clinically depression  treatment on clinically depression  how to identify clinical depression  how to identify normal depression  symptoms of depression  symptoms of clinical depression  दुःखी आणि नैराश्यामधील फरक  नैराश्यामधून बाहेर पडण्याचे उपाय  नैराश्य आलं हे कसं ओळखायचं  नैराश्याचे लक्षणं
तुम्ही दु:खी आहात की नैराश्यग्रस्त आहात?

हैदराबाद - युगानुयुगे जग आपल्या नैराश्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी ‘दुःख किंवा दु:खी’ हा शब्द वापरत आला आहे. आणखी सोप्या शब्दांत सांगायचे झाले, तर ‘दु:खी होणे’ म्हणजेच नैराश्य येणे. समजा एखादी व्यक्ती दु:खी आहे, अशावेळी आपण त्या व्यक्तीला चित्रपटाचं तिकीट देऊ केलं किंवा त्याच्या नेहमीच्या अ‌ॅक्टीव्हीटीपेक्षा काहीतरी वेगळं करायला भाग पाडलं, तर ती व्यक्ती आपल्या भावनिक गुंतागुतीतून सहजपणे बाहेर पडू शकते. परंतु, हा उपाय क्लिनिकल ​​नैराश्य (clinical depression) असणाऱ्या लोकांसाठी लागू होत नाही. ‘दुःखी होणे म्हणजेच नैराश्य येणे’ अशाप्रकारच्या आपल्या समजुतीमुळे क्लिनिकल ​​नैराश्याची संकल्पना बाजूला पडते. यामुळे नैराश्य आणि क्लिनिकल ​​नैराश्य या संकल्पना एकच आहेत की यामध्ये काही फरक आहे? याबाबत नेहमी गोंधळ उडतो.

यापूर्वी क्लिनिकल ​​नैराश्याला मेलान्कोलिया (Melancholia) असे म्हटले जायचे. ज्यामध्ये अत्यंत तीव्र दु:खी लोकांची गणना व्हायची. परंतु, आता आपण अशा मानसिक आजाराला ‘मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर’ असं म्हणतो. नैराश्य आणि क्लिनिकल नैराश्य यांच्या संज्ञा आणि भावना एक सारख्याच वाटत असल्या तरी या दोन्ही आजाराशी संबंधित लोकांची वर्तणूक मात्र पूर्णपणे वेगळी असते.

क्लिनिकल नैराश्य आणि त्याच्या लक्षणांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारतच्या सुखीभवच्या तज्ज्ञांनी (Sukhibhava) हैदराबादेतील आशा रुग्णालयाचे मनोचिकित्सक डॉ. एम. एस. रेड्डी यांच्याशी संवाद साधला. यावेळी डॉ. रेड्डी यांनी सांगितले की, “नैराश्य ही दु: खी किंवा उदासपणाची एक सामान्य भावना आहे. ती आपल्या प्रत्येकाला अधून-मधून जाणवत असते. पण क्लिनिकल ​​नैराश्य ही दीर्घकाळ चालणारी अत्यंत दु:खी अशी गंभीर भावना आहे ”.

“क्लिनिकली नैराश्यग्रस्त लोकांना दीर्घ कालावधीपर्यंत दुःखाची भावना जाणवत राहते. अशा व्यक्तीला दिवसातील बहुतांशी तास आणि आठवड्यातून बहुतेक दिवस उदासपणा जाणवत राहणं. अशी दुःखाची किंवा उदासपणाची भावना किमान दोन आठवड्यांपर्यंत (त्याचे निदान कसे केले जाते) जाणवत राहिली, तर आपण त्याला ‘मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर’ असे म्हणतो”, असे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.

प्रत्येक गोष्टीतला रस गमावणे, एखाद्याशी बोलण्याची किंवा काही खाण्याची इच्छा न होणे किंवा नेहमी झोप लागणे, निराश वाटणे, दुबळा आणि क्षुल्लक वाटायला लागणे, प्रत्येक भावना नकारात्मक आणि निकृष्ट होत जाणे आदी लक्षणांचा यामध्ये समावेश होतो. ही लक्षणे दीर्घकाळ टिकून राहतात. त्यानंतरच आपण याला डिप्रेसिव्ह डिसऑर्डर असं म्हणतो. परंतु, काहीही करण्यास रस नसणे अशाप्रकारची दु: खाची किंवा नैराश्याची लक्षणं काही काळानंतर दूर होतात. पण क्लिनिकल ​​नैराश्याची लक्षणे नेहमीच दीर्घकाळ टिकतात. त्यामुळे लोकांनी नैराश्य आणि क्लिनिकल ​​नैराश्य योग्यप्रकारे समजून घेणे, महत्त्वाचे ठरते. जरी दोन्ही परिस्थितींमध्ये दु:खी होण्याची भावना सारखीच वाटत असली, तरी क्लिनिकली डिप्रेस लोकं दुःखी लोकांपेक्षा खूपच गंभीर अवस्थेत असतात. “एखाद्या व्यक्तीच्या मनोवृत्तीत चढउतार होऊन ती परत सामान्य बनू शकते. पण क्लिनिकल डिसऑर्डरने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला सामान्य होणे, खूप कठीण वाटू शकते”, असेही डॉ. रेड्डी यांनी स्पष्ट केले.

एखादी व्यक्ती सर्वांसोबत नॉर्मल आणि सक्रिय वर्तन करत असते. परंतु, अचानक ती व्यक्ती सर्व गोष्टींमधला रस गमावते आणि बऱ्याच वेळेस दुःखी राहते. ही एक गंभीर बाब आहे. अशाप्रकारचे वर्तन हे क्लिनिकल ​​नैराश्याची प्राथमिक लक्षणं असतात.

डॉ. रेड्डी म्हणाले की, “क्लिनिकली नैराश्यग्रस्त लोकांना ओळखणे कधीकधी खूप कठीण असते.” कारण यांची लक्षणे आणि चिन्हे दुःखी असलेल्या लोकांप्रमाणेच असतात. पण हे केवळ एवढ्यापुरतेच मर्यादीत आहे का? यावर काय उपाय आहेत? यावर ते म्हणाले की, “क्लिनिकल नैराश्याने ग्रस्त लोकांमध्ये दीर्घकाळ लक्षणे दिसतात. तर जी लोकं दु: खी किंवा उदास आहेत, ती काही तासांनंतर किंवा काही काळानंतर अशा भावनांवर मात करतात”.

एखाद्या व्यक्तीला केवळ नैराश्य आहे, की क्लिनिकल नैराश्य आहे. यातील फरक ओळखण्याचा एक महत्त्वपूर्ण ठळक मुद्दा म्हणजे, पहिल्या प्रकारामध्ये कमी कालावधीसाठी आणि कमी तीव्रतेची लक्षणं आढळतात, तर क्लिनिकल नैराश्याच्या बाबतीत तीव्रता अधिक आणि दीर्घकाळापर्यंत असते.

सध्याच्या काळात नैराश्य असणे आणि डिप्रेशन डिसऑर्डर असणे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. एखाद्या व्यक्तीला असलेली लक्षणे जवळून आणि स्पष्ट समजून घेऊन त्याचे निरीक्षण करणे, हाच यावरील एकमेव मार्ग आहे. जर एखादी व्यक्ती व्यवस्थित वागते, अचानक दु: खी होते आणि त्याची लगेचच बहुतेक गोष्टींवरून मन उडते. अशा लोकांकडे जास्त लक्ष देणे गरजेचे असते. अशा लोकांना क्लिनिकल नैराश्य असण्याची शक्यता अधिक असते.

ABOUT THE AUTHOR

...view details