नवी दिल्ली : सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात अनेकदा डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये ( Platelets Decreases ) वाढ होते. हे महिने डेंग्यू मलेरियाचे होण्याचे पिक पीरियड ( Dengue Malaria Chikungunya Symptoms Medicine ) आहेत. या दिवसांत डेंग्यू, मलेरियाची लागण होण्याची दाट शक्यता असते. या साथीच्या आजारात अनेकांचा मृत्यूही होतो. एलएनजेपी हॉस्पिटल नवी दिल्लीचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश कुमार ( Dr Suresh Kumar LNJP Hospital ) यांनी सांगितले की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका आणि विशेषत:तुम्हाला जर साधा ताप येत असेल, तर साधे पेरेसिटोमल टॅब्लेट घेतले तर हरकत नाही. रुग्णाने स्वतःचे मनाने कोणते औषध घेऊ नये.
डॉ. सुरेश कुमार म्हणाले की, रुग्णाला डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया या तापाचा त्रास झाल्यास रुग्णाच्या प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होते आणि अशा परिस्थितीत रुग्णाने ब्रुफेन किंवा स्पिरिन इत्यादी औषधे घेतल्यास त्याच्या प्लेटलेट्सचे प्रमाण आणखी कमी होते. प्लेटलेट्स कमी झाल्याने रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी होत जाते आणि ती आणखी वेगाने कमी होते. त्यामुळे रुग्णाची प्रकृती बिघडत जाते, रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल होण्याचा धोका निर्माण झाला आहे. डॉ सुरेश कुमार, एलएनजेपी हॉस्पिटल सांगतात की, सामान्य ताप आल्यास तुम्ही पॅरासिटामॉल घेऊ शकता आणि प्लेटलेट्स कमी झाल्यास किंवा तुम्हाला इतर काही समस्या असल्यास, तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका.