महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

मानदुखीचे धोके : उपाय आणि प्रतिबंध

तणाव, बसण्याची अयोग्य शैली, लठ्ठपणा, स्नायूंमधील तणाव, आर्थरायटीस आणि दुखापतीमुळे मानदुखी होऊ शकते असे जिंदाल नेचरक्युअर संस्थेचे वरिष्ठ नॅचरोपॅथ एस एस श्रीकांत म्हणाले. पहिल्या टप्प्यातच त्रास कमी करणे हा मानदुखीवरील चांगला उपाय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मानदुखीचे धोके : उपाय आणि प्रतिबंध
मानदुखीचे धोके : उपाय आणि प्रतिबंध

By

Published : Mar 5, 2021, 1:27 PM IST

मानदुखी हे जगभरातील अपंगत्वामागील चौथे महत्वाचे कारण असल्याचे समोर आले आहे. मानदुखीचा आपल्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम जाणवतो. चांगली झोप, कुटुंबासोबतचा वेळ यावर मानदुखीचा परिणाम होतो. तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये मानेचे दुखणे सामान्य असल्याचे दिसून येत आहे.

लवकर उपाय महत्वाचा

तणाव, बसण्याची अयोग्य शैली, लठ्ठपणा, स्नायूंमधील तणाव, आर्थरायटीस आणि दुखापतीमुळे मानदुखी होऊ शकते असे जिंदाल नेचरक्युअर संस्थेचे वरिष्ठ नॅचरोपॅथ एस एस श्रीकांत म्हणाले. पहिल्या टप्प्यातच त्रास कमी करणे हा मानदुखीवरील चांगला उपाय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय नॅचरोपॅथीमुळे मानदुखीवर सुरक्षित आणि प्रभावीपणे उपाय केला जाऊ शकतो. याचे कसलेही दुष्परिणाम नसल्याचेही ते म्हणाले. योग, मसाज, वनौषधी, अॅक्युपंक्चर, जीवनशैलीतील बदल आणि नॅचरोपॅथीद्वारे मानदुखीपासून सुटका मिळविणे शक्य असल्याचे ते म्हणाले.

मानदुखीचे धोके

स्नायूंमधील तणाव आणि मज्जासंस्थेतील आकुंचनामुळे मानदुखीचा त्रास जाणवतो. लक्षणांवरून नेमके कारण सांगणे कठिण असते. बसण्याची अयोग्य पद्धत, वजन उचलणे, झोप, तणाव, चिंता यामुळे स्नायूंमध्ये तणाव जाणवू शकतो. मणक्यातील डिस्क सरकल्यास मज्जासंस्थेत आकुंचन होऊ शकते. किंवा मानेतील पेशींना संसर्ग झाल्यासही असे होऊ शकते. कारण काहीही असले तरी मानदुखीकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. यामुळे आयुष्यभराच्या अपंगत्वाचाही सामना करावा लागू शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

योगासनांमुळे मानदुखीचा त्रास कमी होतो

योगाद्वारे उपचार

तीव्र वेदनांवर उपचारांसाठी योग उपचारांचा सल्ला दिला जातो. यात मानदुखीवरील उपचारांसाठीही योग करण्याचा सल्ला दिला जातो. योगासनांमुळे वेदना कमी होऊन मानेची हालचाल करणे सुलभ होत असल्याचे दिसून आले आहे. दररोज 15 ते 20 मिनिटे योगासने केल्यास स्नायू ताणले जाऊन रक्ताभिसरण सुधारते. तसेच मानदुखीचा त्रास कमी होतो. मार्जारासन, बिटिलासन, बलासन, नटराजासन, विपरित करणी, शवासन ही आसने मानदुखीवर प्रभावी ठरतात.

मसाज थेरपी

मसाज थेरपीही मानदुखीवर प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे. मसाज थेरपीमुळे मृदु पेशींचे कार्य सुधारण्यासोबत रक्ताभिसरणातही सुधारणा होते. तसेच स्नायूंमधील तणावही कमी होतो. त्यामुळे मानदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

मसाज थेरपी हा मानदुखीवर चांगला उपाय आहे

वनौषधी

मानदुखीवर काही वनौषधीही प्रभावी ठरतात. चहासारख्या वनौषधींचे सेवन, तसेच अंघोळीच्या पाण्यातून वापर, वनौषधींची वाफ घेणे, वनौषधींच्या तेलाची मालीश अशा उपायांनी मानदुखीचा त्रास कमी होतो. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वनौषधींच्या उपचार पद्धतींचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते.

जीवनशैलीत बदल

जीवनशैलीत सुधारणा करणे हा मानदुखीवर नियंत्रणासाठी सर्वात महत्वाचा उपाय आहे. बसण्याच्या आणि चालण्याच्या योग्य पद्धतीचा सराव करणे यासाठी सर्वात महत्वाचे आहे. पुरेशी झोप घेणे. झोप घेतानाही योग्य पद्धतीने झोपणे. मानेचे नियमित व्यायाम करणे. कामातून ठराविक वेळाने ब्रेक घेणे या पद्धतींचा अवलंब केल्यास मानदुखीला आपण दूर ठेवू शकतो.

ABOUT THE AUTHOR

...view details