महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

New Techniques Of Disease Diagnosis : कोविडमुळे रोग निदानाची आली नवीन तंत्रे ; आता प्रगती थांबू नये

कोरोनामुळे जगभरातील आरोग्य व्यवस्थेतील पितळ उघडे पडले आहे. मात्र कोरोनामुळे आता रोगनिदान करण्याच्या तंत्रात मोठी सुधारणा झाल्याचा दावा प्रिटोरिया विद्यापीठाच्या संशोधक अंजेलिका लूट्स यांनी केला आहे.

new techniques of disease diagnosis
संग्रहित छायाचित्र

By

Published : Mar 27, 2023, 4:25 PM IST

प्रिटोरिया :कोरोनामुळे जगभरातील अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक नागरिकांची कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. मात्र कोरोना आल्यामुळे रोग निदानाची विविध तंत्रे विकसित करण्यात आली आहेत. त्याचा फायदा नागरिकांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी होत असल्याचे उघड होत आहे. कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेतील गंभीर चुका उघड झाल्या होत्या. त्यामुळे जागतिक पातळीवर सगळ्याच देशांनी आरोग्य व्यवस्थेच्या सुधारणांवर भर दिला आहे. याबाबत प्रिटोरिया विद्यापीठाच्या संशोधक अँजेलिका लूट्स यांनी रोगनिदानाची तंत्रे कशी विकसित झाली, याबाबत संशोधन केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनेच्या महासंचालकांनी केले आवाहन :कोरोनाला जागतिक महामारी घोषित करण्याच्या अगोदर मार्च 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयस यांनी एक भाषण केले होते. यात त्यांनी चाचणीच्या महत्त्वावर जोर दिला होता. संसर्ग रोखून जीव वाचवण्याचा संक्रमणाची साखळी तोडणे हा प्रभावी मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यासाठी आपण चाचणी आणि विलगीकरण करणे आवश्यक आहे. तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधून आगीशी लढू शकत नाही. कोणाला संसर्ग झाला आहे हे माहीत नसल्यास आपण हा साथीचा रोग थांबवू शकत नसल्याचेही गेब्रेयसस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले होते.

रोग निदानाची नवीन तंत्रे केली विकसित :कोरोनाने विद्यमान निदान तंत्रातील गंभीर कमतरता उघड केल्या. त्यामुळे या पद्धतींपेक्षा जलद, सोप्या, स्वस्त आणि अगदी अचूक चाचण्यांची तातडीची गरज आहे. तीन वर्षांनंतर निदानाचा चेहरा बदलला आहे. रोग निदानाची नवीन तंत्रे विकसित केली गेली आहेत. ती तंत्रे इतर उदयोन्मुख रोगांवर लागू केली जाऊ शकतात. या उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये पारंपरिक चाचण्यांसह, सध्याच्या निदान प्रक्रियेतील अडथळ्यांवर मात करण्याची क्षमता असल्याचे प्रिटोरिया विद्यापीठाच्या संशोधक अँजेलिका लूट्स यांनी स्पष्ट केले. आरोग्य सेवेमध्ये चाचण्यांचा समावेश करून चिकित्सक अचूक औषधांचा सराव करू शकतात. त्यामाध्यमातून संभाव्य उद्रेकांवर उपचार देण्यासाठी अधिक सुसज्ज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. SARS-CoV-2 या व्हायरससाठी पहिल्या निदान चाचण्यांमध्ये रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेझ रिअ‍ॅक्शन (RT-PCR) सारख्या स्थापित आण्विक तंत्रांचा वापर केला गेला. ही तंत्रे जीव शोधून त्यांची जनुकीय सामग्री लाखो पटीने वाढवून ओळखत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

विषाणूची चाचणी करण्याचे मार्ग करावे विकसित :कोरोनाच्या चाचण्या घेण्यासाठी प्रशिक्षित तंत्रज्ञ आणि महागडी उपकरणे आवश्यक असतात. साथीचा रोग अधिक गंभीर होत असताना विषाणूची चाचणी करण्याचे इतर मार्ग विकसित करावे लागले. डायग्नोस्टिक चाचण्या प्रभावीपणे चालवण्यासाठी आवश्यक असलेले पदार्थ आणि संयुगे यांचा पुरवठा कमी होता. अनेक देशांमध्ये सध्याच्या चाचण्यांसाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक प्रयोगशाळा नाहीत. आफ्रिकन खंडातील कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांकडेही मर्यादित वित्त होते. तर रुग्ण हाताळण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित विशेषज्ञ नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आयसोथर्मल तंत्रांने रुग्ण तपासणीची गरज पूर्ण करण्यात मदत केली. ही एक सोपी प्रक्रिया आहे. ती स्थिर तापमानात डीएनए आणि आरएनए जलद आणि प्रभावीपणे वाढवते. रोगप्रतिकारक तपासणी देखील मदत करते. या चाचण्या साइटवर किंवा प्रयोगशाळेत वापरल्या जाऊ शकतात. जेव्हा एखादा परदेशी रेणू शरीरावर आक्रमण करतो, तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडी तयार होत असल्याचेही प्रिटोरिया विद्यापीठाच्या संशोधक अँजेलिका लूट्स यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - Corona Vaccination : लसीकरणामुळे कोरोनाचा धोका होतो अर्ध्यापेक्षा कमी, मात्र लठ्ठ नागरिकांना आहे धोका

ABOUT THE AUTHOR

...view details