नवी दिल्ली : कोरोनाचा बालकांच्या मानसिक आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम झाल्याचा दावा लॅन्सेटच्या अभ्यासकांनी केला आहे. द लॅन्सेट चाइल्ड अँड अॅडॉलेसेंट हेल्थ जर्नलमध्ये याबाबतचे संशोधन प्रकाशित झाले आहे. हे संशोधन 64 हजार पेक्षा जास्त 13 ते 18 वर्षांच्या उत्तर अमेरिकन बालकांवर करण्यात आले. या संशोधनातून दोन वर्षापूर्वी आलेल्या कोरोना आधी आणि त्यानंतर मूल्यांकन करण्यात आले आहे. त्यातून या बालकांच्या माणसिक आरोग्यावर कोरोनाचा दिर्घकाळ परिणाम झाल्याचे आढळून आल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.
मुलांच्या नैराश्यात झाली वाढ :कोविड 19 साथीच्या रोगाचा जागतिक प्रसार झाल्यानंतर एका वर्षात 13 ते 18 वर्षांच्या किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्य वाढ झाल्याचे आढळून आले आहे. याबाबत अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील संशोधकांनी 2021 च्या अभ्यासात याबाबतचे संशोधन केले आहे. या मुलांच्या माणसिक आरोग्यावर परिणाम झाला असून त्यांच्या व्यसनात घट झाल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. विशेषत: सिगारेट ओढणे, दारूची नशा यामध्येही घट दिसून आल्याचे या संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
धूम्रपानात झाली घट झाली :कोरोनाच्या साथीमुळे बालकांच्या मनावर नकारात्मक परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या काळात बालकांच्या धूम्रपानात कमालीची घट दिसून आली आहे. ती घट सलग दोन वर्ष कमी झाल्याचा दावा रेकजाविक विद्यापीठाचे प्राध्यापक थोरहिल्दुर हॉलडोरसडोटिर यांनी केला. मात्र बालकांच्या माणसिक आरोग्यावर कोरोनाच्या साथीचा जबरदस्त परिणाम झाला आहे. हा परिणाम सामाजिक निर्बंध उठवल्यानंतरीह कायम असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
मुलांच्या नशेचे निरीक्षण करणे आवश्यक :कोरोनाच्या काळात बालकांच्या धूम्रपानात घट झाली आहे. मात्र त्यांच्या मद्यपानाच्या घटनेत आता पूर्ववत होत आहेत. त्यामुळे बालकांच्या मद्यपानाच्या नशेचे निरीक्षण करमे गरजे असल्याचे प्लॅनेट युथचे मुख्य डेटा विश्लेषक आणि संशोधक इंगिबजोर्ग इवा थोरिसडोटिर यांनी सांगितले. बालकांच्या माणसिक आरोग्याची स्थिती लक्षात घेता या बालकांमध्ये मद्यपान वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोरोनाचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी नैराश्याच्या लक्षणांवर लक्ष केंद्रित करून प्रतिबंधात्मक प्रयत्नांची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापक आणि संशोधक जॉन अॅलेग्रॅंटे यांनी स्पष्ट केल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
हेही वाचा - Sleep Necessary Before Exams : परीक्षेपूर्वी झोप आहे महत्वाची, नाहीतर होऊ शकतात हे दुष्परिणाम