गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने नागरिकांना फक्त शारीरिक आजाराची भीतीच नव्हे, तर मानसिक त्रास, चिंता आणि तणावासारख्या समस्या देखील दिल्या आहेत. कोविड-१९ चा काळ स्त्री-पुरुषांच्या आरोग्यावर खूपच भारी गेला. विशेष करून पुरुषांबाबत बोलायचे, तर मानसिक त्रास, शिस्तबद्ध नसलेली जीवनशैली, नित्यक्रमामुळे त्यांच्या लैंगिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. वर्तमान काळात पुरुषांमध्ये लैंगिक संबंधांकडे दुर्लक्ष करण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावरही परिणाम करत आहे कोविड - १९
कोविड - १९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितींचा परिणाम पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावर खूप नकारात्मकरित्या झालेला आहे. विशेष करून कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे झालेल्या जनहाणीने नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर एक अलगच प्रकारचा परिणाम टाकला. डॉक्टरांच्या मते, मानसिक आरोग्यात झालेले विकार व्यक्तीच्या लैंगिक आरोग्यावर परिणाम टाकतात. याबाबीचे पुष्टीकरण कोरोना काळात विशेष करून पुरुषांमध्ये वाढलेल्या लैंगिक समस्येसंबंधी आकडे करतात.
हार्मोन्समध्ये असंतुलन
अँड्रो केअर अँड अँड्रोलॉजी इन्स्टिट्यूट, हैदराबादमधील अँड्रोलॉजिस्ट डॉ. राहुल रेड्डी सांगतात की, लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यापासूनच डॉक्टरांकडे लैंगिक समस्येसंबंधी सल्ला मागणाऱ्या पुरुषांची संख्या वाढली आहे. ज्यात बहुतेक पुरुष लैंगिक इच्छेत कमी आणि अंशत: इरेक्टाईल डिसफंक्शन (नपुंसकता) या समस्येचा सामना करत आहेत. लॉकडाऊनमुळे शिस्तबद्ध नसलेले नित्यक्रम आणि जीवनशैलीमुळे पुरुशांच्या शारीरिक क्षमतेला खूप जास्त प्रभावित केले आहे.
व्यायामाचा अभाव, जेवणाविषयी असंतुलन, जास्त मद्यपान यांसारख्या अनेक अस्वस्थ सवयी, तथा अधिक मानसिक दबाव, यामुळे मोठ्या संख्येत पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉनची कमतरता दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर, या परिस्थितीमुळे लैंगिक इच्छेत कमी आणणाऱ्या प्रोलॅक्टिनच्या पातळीवरही परिणाम होत आहे. जरी देशातील बहुतांश भागांमध्ये लॉकडाऊन हळू-हळू उघडत असले, तरी लॉकडाऊन काळात जास्त काळ घराच्या आत राहणाऱ्या पुरुषांमध्ये विटामिन-डी सह इतर आवश्यक पोषक तत्वांमध्ये घट दिसून आली आहे, असे डॉ. रेड्डी म्हणाले.