आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाला असे आढळून आले की, कोरोना विषाणू मानवी शरीरात 232 दिवसांपर्यंत राहू शकतो. काही लोक विषाणूपासून बरे झाल्यानंतरही त्यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह येतात. आणि त्यांना दीर्घकाळ कोविड लक्षणे दिसून येतात.
फ्रान्सच्या पाश्चर इन्स्टिट्यूट, साओ पाउलो विद्यापीठ (यूएसपी) आणि ब्राझीलमधील ओस्वाल्डो क्रूझ फाउंडेशन (Oswaldo Cruz Foundation) (फिओक्रूझ) च्या संशोधकांनी एक अभ्यास केला. यात 38 ब्राझिलियन रुग्णांचा समावेश होता. दोन किंवा तीन वेळा RT-PCR चाचणी निगेटिव्ह येईपर्यंत रुग्णांचा पाठपुरावा करण्यात आला. 38 पुरूषांपैकी दोन पुरुष आणि एक स्त्रींच्या शरीरात 70 दिवसांपेक्षा हा विषाणू आढळून आल्याचे फ्रंटियर्स इन मेडिसीन जर्नलमध्ये (journal Frontiers in Medicine) प्रकाशित झालेल्या संशोधनात आढळून आले आहे.
8 टक्के लोकांत आढळली कोरोना लक्षणे
"यावरून सुमारे सुमारे 8 टक्के लोकांना संसर्गाच्या अंतिम टप्प्यात कोरोना लक्षणे दिसून आली. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ विषाणू प्रसारित करतील, असेही म्हणाले. लेखक मेरीएलटन डॉस पासोस कुन्हा यांनी 20 दिवसांपर्यंत 38 वर्षीय पुरुषामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. त्याच्या शरीरात 232 दिवस लक्षणे दिसून आली. “कोरोना नियमांचे पालन न केल्यास सात महिन्यांत कोरोनाचे संक्रमण झाले असते.” ते पुढे म्हणाले. कोरोना विषाणूचा 14 दिवसांचा कालावधी पुरेसा आहे. रुग्णाची नकारात्मक चाचणी येण्यासाठी एक महिना लागतो. काही केसेसमध्ये 71 ते 232 दिवस रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह राहिले आहेत.