हैदराबाद -विविध लसींमुळे दर वर्षी कोट्यवधी लोकांचे जीव वाचतात. लसी या जंतूंचाच एक भाग आहेत. जे आपल्या शरीरात सोडले जातात. शरीराची त्यांच्याशी ओळख होते आणि शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. म्हणजे कधी शरीरात खऱ्या जंतूंनी प्रवेश केलाच तर त्यांच्या विरोधात लढण्यासाठी शरीर तयार असते आणि संसर्ग होत नाही. ईटीव्हीच्या सुखीभव टीमने फार्मा स्ट्रॅटेजिक कन्सल्टंट स्वरूप पांडा यांच्याशी याबद्दल चर्चा केली.
सध्या कोविड-१९ लसीचे ५० हून जास्त प्रकार आहेत. कोरोना विषाणूसाठी जर आपल्याकडे स्पाइक प्रोटीनविरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीज असतील तर हा रोग होण्याची शक्यता खूपच कमी असते. अँटीबॉडीज तयार करण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे स्पाइक प्रोटिनचा भाग असलेली लस टोचून घेणे किंवा स्पाइक प्रोटिनच घेणे. स्पाइक प्रोटिन शरीरात घेतले तर ते शरीराला स्पाइक प्रोटिन कसे बनवायचे याच्या सूचना देते आणि शरीराला ते तयार करू देते. लसीमध्ये असलेले स्पाइक प्रोटिन हे एकदम कमकुवत असते. त्यामुळे कुठलाही आजार होत नाही. म्हणूनच लस टोचून तुम्ही आजारी पडत नाही.
कोविड-१९ची लस तुमच्या शरीरात तुम्हाला आजारी न पाडता या रोगाविरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार करते. ज्या लोकांपासून तुम्हाला कोविड-१९ होण्याचा धोका आहे, त्यांच्यापासून ही लस तुमचे संरक्षण करते. देशभरात केलेल्या अभ्यासानुसार ही लस घेणे तुम्ही सहन करू शकता, ती सुरक्षित आहे आणि ठराविक अँटीबॉडीज निर्माण करून ती तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
या लसीच्या फायद्याच्या तुलनेत दुष्परिणाम एकदम कमी आणि सहन करू शकू असे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की, लस अधिकृत करण्याआधी ती किती सुरक्षित आहे, हे तपासले जाते. कोव्हॅक्सिन ३० हजारांहून अधिक स्वयंसेवकांवर वापरून पाहिली गेली आहे. नंतरच ती अधिकृत केली गेली. या लसीचे परिणाम समाधानकारक आल्यानंतरच भारतातल्या ड्रग कंट्रोल जनरलने आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. ही माहिती नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन लसी प्रशासन (एनईजीव्हीएसी) च्या मार्गदर्शनावर आधारित आहे.