लंडन :युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लिया (यूएई) (University of East Anglia (UAE), यूकेच्या शास्त्रज्ञांनी जवळपास 3,60,000 रुग्णांच्या डेटाची (Patients data checked) तपासणी केल्यानंतर हा निष्कर्ष काढला आहे. ते म्हणाले की, लाँगकोविड रूग्णांपैकी एक तृतीयांश वास ओळखण्यात अपयशी ठरतात आणि एक पंचमांश त्यांची चव गमावतात. हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण चव आणि वास कमी झाल्यामुळे लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. स्वच्छतेपासून लैंगिकतेपर्यंत, त्याचा दैनंदिन जीवनातील प्रत्येक पैलूवर परिणाम होतो, असे संशोधक कार्ल फिलपॉट यांनी सांगितले.
Corona Update : कोरोना झाला जीवघेना; 'हे' आहेत लँग कोविडचे मुख्य लक्षण! - symptoms of lang covid
भूतकाळात, बऱ्याच संशोधनातून असे दिसून आले आहे की दीर्घकाळ कोविडने ग्रस्त लोकांमध्ये सुस्ती, नैराश्य, डोकेदुखी (lethargy, depression, headache) आणि इतर लक्षणे आहेत. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, त्यांच्यातील प्रमुख लक्षण म्हणजे वास कमी होणे किंवा त्यांना अजिबातच वास न येणे. स्वच्छतेपासून लैंगिकतेपर्यंत, त्याचा दैनंदिन जीवनातील प्रत्येक पैलूवर परिणाम होतो, असे संशोधक कार्ल फिलपॉट यांनी सांगितले. ( symptoms of lang covid)
![Corona Update : कोरोना झाला जीवघेना; 'हे' आहेत लँग कोविडचे मुख्य लक्षण! Corona became fatal These are the main symptoms of lang covid](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17279864-thumbnail-3x2-covid.jpg)
बचावात्मक उपाय योजना करायला सुरवात करावी :चीननंतर आता जगात कोरोनाचा (Omicron variant) प्रादुर्भाव वाढतो (Corona increasing) आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवे दिशानिर्देश जारी केले (Central government issued new guidelines) आहे. राज्य सरकारने सुद्धा बचावात्मक उपाय योजना करायला सुरवात करावी अशी मागणी माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. आज कोरोनाच्या विषयावर Coronavirus news मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या उपस्थितीत कोविड नियंत्रण आढावा बैठक (Covid Control Review Meeting) होणार आहे.
कोरोनाची नवीन रूपे : चीन, ब्राझील आणि इतर देशांमध्ये कोविड-19 चा उद्रेक लक्षात घेता आपण सतर्क राहण्याची गरज आहे. आम्ही केंद्र सरकार आणि (WHO) च्या सल्ल्याचे काटेकोरपणे पालन करणे आणि ट्रॅकिंग, चाचणी, उपचार आणि कोविड-योग्य वर्तन (Coronavirus today Maharashtra) यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांनी म्हटले आहे. आम्ही ग्रामीण भागात ऑक्सिजन प्लांट बनवले. पण ते आता चांगल्या स्थितीत आहेत की नाही हे तपासण्याची गरज आहे. औषधांचाही तुटवडा आहे असे मला वाटते. कोरोनाची नवीन रूपे जाणून घेण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग महत्वाचे आहे. व्हेंटिलेटर आणि कर्मचाऱ्यांची कमतरता भासू नये यासाठीही व्यवस्था केली पाहिजे असेही टोपे यांनी म्हटले आहे. (Corona cases in Maharashtra, symptoms of lang covid)