पालकत्व हे कठीण असू शकते आणि त्यात अनेक निर्णय घ्यावे लागतात. त्यातलाच एक महत्त्वाचा आणि आयुष्य वाचवणारा निर्णय म्हणजे तुमच्या बाळाच्या भविष्यातल्या आरोग्यासाठी नाळेतून रक्त घेऊन ते साठवून ठेवायचे. नाळ ही बाळ पोटात असताना आई आणि बाळाला जोडणारी असते. पुढे जाऊन तुमच्या बाळाला ब्लड कॅन्सर, अप्लास्टिक अॅनिमिया किंवा थॅलेसिमियासारखे आजार झाले तर या काॅर्ड रक्तसंचयामुळे त्याला किंवा तिला आपला आजार बरा होण्याची संधी मिळू शकते.
काॅर्ड रक्तसंचयाची गरज का आहे?
दर वर्षी जुलै महिना हा रक्त जागरुकता महिना म्हणून साजरा होतो आणि आज आपण काॅर्ड रक्त आणि त्याचे महत्त्व यावर प्रकाशझोत टाकणार आहोत. स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. रेणुका गुप्ता म्हणतात, ‘जन्मानंतर बाळाच्या नाळेमध्ये खास पेशी असते. तिला स्टेम सेल्स म्हणतात. कालांतराने या पेशींचे रूपांतर रक्त पेशीत होते. या पेशी संसर्गाविरोधात लढा देऊ शकतातच, शिवाय शरीरात ऑक्सिजनचे वहन करून रक्ताच्या गुठळ्या करण्यास यांची मदत होते.’
काॅर्ड रक्तसंचयाबद्दल लोकांना अजून फारसे माहीत नाही. याबद्दल सांगताना रेणुका म्हणतात, ‘ आपल्या देशात रक्तात झालेल्या बिघाडासाठी साठवलेल्या काॅर्ड रक्ताचा वापर फार कमी केला जातो किंवा स्टेम प्रत्यारोपणातही असा वापर करताना फारसे आढळत नाही. यामागे दोन कारणे असावीत. एक तर लोकांना याबद्दल फारसे माहीत नाही, ते याबद्दल जागरुक नाहीत किंवा उपचारादरम्यान संचय केलेले रक्त घेऊन येण्यासाठी अत्यंत कमी वेळ असू शकतो.’