हैदराबाद : कोणताही भारतीय पदार्थ तळलेले-भाजलेले किंवा तिखट मसाल्याशिवाय अपूर्ण आहे. बहुतेक घरांमध्ये पुरी, पकोडे, छोले हे सणाला किंवा समारंभाच्यादिवशी बनवले जातात. बर्याचदा आपण पुरणपोळी किंवा पकोडे तळल्यानंतर उरलेले तेल भाजी किंवा इतर डिशमध्ये वापरतो. पण हे तेल वापरून तुम्ही तुमच्या शरीराचे किती नुकसान करत आहात हे तुम्हाला माहीत आहे का? हे तेल तुमच्या आरोग्याला अनेक हानी पोहोचवू शकते. त्यामुळे कॅन्सर आणि मधुमेहासारखे गंभीर आजारही होऊ शकतात.
- उरलेले तेल पुन्हा का वापरू नये?स्वयंपाकाचे तेल पुन्हा वापरणे टाळले पाहिजे. कारण असे केल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. वास्तविक जेव्हा तुम्ही तेल पुन्हा गरम करता तेव्हा ते खराब होऊ लागते आणि त्यात ट्रान्सफॅटी ऍसिडचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे आरोग्याला खूप नुकसान होते.
तेल कसे खराब होते :आपण स्वयंपाकासाठी जे तेल वापरतो, त्या सर्वांमध्ये फॅटी अॅसिड असते. ही फॅटी ऍसिडस् देखील तीन प्रकारची असतात. परंतु मुख्यतः शॉर्ट चेन फॅटी ऍसिड खाद्यतेलामध्ये आढळतात. पॅनमध्ये तेल गरम केल्यावर, शॉर्ट चेन फॅटी ऍसिड तुटते, त्याचे बंध तुटतात आणि ऑक्सिजन आणि हायड्रोजनने बदलले जातात. ऑक्सिजनमुळे ऑक्साइड तयार होऊ लागतो, जो शरीरासाठी हानिकारक मानला जातो. त्याच्या वापरामुळे हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात.