मुंबई- दोन व्यक्तींनी दोन कुटुंबांना आनंदाने एकत्र आणणे, म्हणजे लग्न. हे आनंदाचे एक होणे म्हणजे दोन शरीरांचा उत्सव. समाजासाठी नव निर्मिती करणे हे यांचे ध्येय. एकदा का लग्न समारंभ पार पडला की दुसरा प्रश्न आणि अपेक्षा केंद्रस्थानी असते ती म्हणजे विवाह पूर्ततेची. अर्थातच सेक्स अनुभवाची. काही जणांसाठी हा प्रश्न आल्हाददायी नसेलही कारण त्यांचा पहिला प्रयत्न यशस्वी झाला नसेल. यामुळे जोडीदारांमध्ये अस्वस्थता, भीती आणि चिंता वाढते. त्यामुळे पुन्हा परफाॅर्मन्सबद्दल तणाव वाढतो.
योग्य वयात योग्य व्यक्तीकडून योग्य माहिती मिळाली, तर ते महत्त्वाचे ठरते. यामुळे प्रत्येक अनुभव हा आनंददायी आणि परिपूर्णता देणारा ठरतो. पण दुसरी बाजू अशीही आहे की विशेषत: वेदना, असुविधा याबद्दल माणसाचा अतिशयोक्ती करण्याचा स्वभाव आहे. याशिवाय खालील काही कारणांमुळे अडचणी निर्माण होतात – सेक्सबद्दलच्या योग्य माहितीचा अभाव, पुरुषांमध्ये असलेला परफाॅर्मन्सबद्दल तणाव, लैंगिक अत्याचाराचा इतिहास, अवास्तव गोष्टींबद्दलची भीती, काही धार्मिक असलेले कडक नियम आणि काही कुटुंबाचे सेक्सबद्दलचे कडक नियम. यामुळे अखेरीस स्त्रियांमध्ये तसेच पुरुषांमध्येही मनोविकृतीची भीती निर्माण होते. या सर्व कारणांचा परिणाम विचार प्रक्रिया आणि अंतर्गत संवादांवर होतो आणि यामुळे असमाधान वाढते. मनापेक्षा डोक्याने विचार करणे ही आनंदाची गुरूकिल्ली आहे. यामुळे विचार करणारा मेंदू आणि भावनिक मेंदू यांच्यात संघर्ष होईल. यासाठीच खालील काही टिप्स उपयोगी पडू शकतात.
निष्कर्षाकडे उडी मारणे – आपल्या जोडीदाराला काय हवे आहे, हे आपल्याला माहीत आहे, अशी खात्री जोडीदाराला असते. हे असे वाटत राहते, कारण जोडीदारांना वाटते ते एकमेकांना आतून बाहेरून चांगलेच ओळखतात. या प्रवृत्तीमुळे त्यांच्या स्वत:च्या भावनाही दडपल्या जाऊ शकतात आणि त्यामुळे नव्या कृतीचे स्वागत करणे होत नाही.
त्रासदायक भविष्यवाणी – नकारात्मक विचार करणे आणि आपल्याला काही जमणार नाही, अशी भावना सतत बाळगल्याने तुमचे शरीर परफाॅर्मन्स देऊ शकत नाही.
शिक्का मारणे – स्वत: वर किंवा जोडीदारावर शिक्का मारला जाऊ शकतो, म्हणजे लेबलिंग केले जाते. हा शिक्का स्वत:वर मारला तर व्यक्तीच्या मनात सारखी अपराधी भावना राहते आणि याचा परिणाम निराशेचे विचार येऊ शकतात. जोडीदारावर शिक्का मारला तर जोडीदार सारखा सतर्क राहील आणि याचा परिणाम त्याचा परफाॅर्मन्स बिघडेल.