महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Coconut for hair : फक्त तेलच नाही तर नारळपाणी देखील बनवते केसांना निरोगी; वाचा कसं वापरायचं ते... - नारळपाणी देखील बनवते केसांना निरोगी

Coconut for hair : केसांसाठी नारळाचे तेल जितके महत्त्वाचे आहे, तितकेच नारळपाणी देखिल केसांसाठी उपयुक्त आहे. नारळ पाण्याने तुमचे केस मजबूत होतात. त्याचबरोबर इतर अनेक फायदे देखिल आहेत.

Coconut for hair
नारळपाणी

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2023, 2:36 PM IST

हैदराबादCoconut for hair: नारळपाणी आरोग्यासाठी तसंच त्वचा आणि केसांसाठी खूप चांगलं आहे. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात. तुम्ही तुमच्या हेअरकेअर रुटीनमध्ये देखील याचा समावेश करू शकता. यामुळे केसांशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. यामुळे तुमचे केस मजबूत होतील. याच्या मदतीने तुम्ही तुमचे केस तुटण्यापासून वाचवू शकाल. नारळाच्या पाण्यामुळे केस लवकर वाढण्यासही मदत होते. केसांसाठी नारळाच्या पाण्याचा वापर कोणत्या प्रकारे करू शकता ते जाणून घ्या.

  • शॅम्पूसह नारळ पाणी : यासाठी अर्धा कप नारळ पाणी घ्या. शॅम्पूमध्ये नारळाचे पाणी मिसळा. आता हा शॅम्पू केसांसाठी वापरा. यामुळे तुमचे केस निरोगी राहतील. केस मऊ आणि चमकदार राहतील.
  • नारळ पाणी आणि कोरफड जेल: एका भांड्यात 2 चमचे एलोवेरा जेल घ्या. त्यात साधारण २ ते ३ चमचे नारळाचे पाणी घाला. या दोन गोष्टी मिक्स करून संपूर्ण डोक्याला लावा. काहीवेळ डोक्याला हाताने मसाज करा. कोरफड आणि नारळाच्या पाण्याची पेस्ट केसांवर अर्धा तास राहू द्या. यानंतर टाळू पाण्याने स्वच्छ करा.
  • नारळ पाणी आणि दही :नारळाचे पाणी आणि दही मिक्स करूनही केसांसाठी पेस्ट बनवू शकता. ही पेस्ट केस आणि टाळूवर काहीवेळ लावा. यानंतर काही मिनिटे टाळूची मालिश करा. साधारण अर्धा तास असेच राहू द्या. तुम्ही दही आणि नारळाच्या पाण्याची पेस्ट आठवड्यातून एक किंवा दोनदा वापरू शकता.
  • केसांना नारळाच्या पाण्याने स्प्रे करा :केसांसाठी तुम्ही नारळाचे पाणी वापरू शकता. एका स्प्रे बाटलीत नारळ पाणी घाला. आता ते केसावर स्प्रे करा. जेव्हा तुम्ही केसांवर नारळाच्या पाण्याने स्प्रे करता तेव्हा ते टाळू आणि केस निरोगी ठेवतात.
  • जास्वंदीची फुले आणि नारळ पाणी : तुम्ही केसांसाठी जास्वंदीच्या फुलांची आणि नारळाच्या पाण्याची पेस्ट देखील तयार करू शकता. यासाठी सुमारे 8 जास्वंदीची फुले मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये नारळाचे पाणी घाला. ही पेस्ट केसांवर आणि टाळूवर काहीवेळ लावा. यानंतर केस झाकून ठेवा. एक तासानंतर केस धुवा.

ABOUT THE AUTHOR

...view details