हैदराबाद Clean nonstick cookware : नॉन स्टिक भांडी कमी तेलात स्वयंपाक करण्याच्या उद्देशाने तयार केली जातात. अशा परिस्थितीत या भांड्यांवर एक थर लावला जातो, ज्यामुळे भांड्यांना काहीही चिकटत नाही. याशिवाय ही भांडी सामान्य भांड्यांपेक्षा वेगळी असतात. त्यामुळे ही भांडी अतिशय काळजीपूर्वक सांभाळावी लागतात. अन्यथा ती खराब होतात. त्यामुळे स्टील स्क्रबरसारख्या कठीण वस्तूने ती घासून स्वच्छ करण्याची चूक कधीही करू नये. तुमची नॉन स्टिक भांडी जळल्यावर स्क्रबरऐवजी तुम्ही 'या' उपायांची मदत घेऊ शकता.
मिठाच्या पाण्यानं करा स्वच्छ : जळलेली नॉन-स्टिक भांडी स्वच्छ करण्याचा सर्वात स्वस्त आणि प्रभावी मार्ग म्हणजे ती मिठाच्या पाण्यानी धुणे. यासाठी कोमट पाण्यात 4-5 चमचे मीठ मिसळून पेस्ट तयार करा आणि 15-20 मिनिटे जळलेल्या भांड्यावर ठेवा. आता स्पंजने घासून स्वच्छ पाण्याने धुवा. जर डाग पूर्णपणे निघाले नाही तर ही प्रक्रिया पुन्हा करा.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर वापरा : जळलेले नॉन-स्टिक भांडे नव्यासारखे चमकण्यासाठी, गरम पाण्यात बेकिंग सोडा मिसळा आणि थोडावेळ उकळाा. नंतर त्यात थोडे व्हिनेगर घाला आणि पेस्ट तयार करा. नंतर जळलेल्या भागावर लावा आणि 5-10 मिनिटे ठेवा. आता ते स्पंजने घासून स्वच्छ करा.