हैदराबाद : सहसा मुले दूध पिण्यास नकार देतात. त्यांना दुधाचा पेला संपवणे हे युद्ध लढण्यापेक्षा कमी नाही असे बहुतेक मातांना वाटते. लहान मुले असो वा प्रौढ, अनेकांना दुधाची चव आवडत नाही. त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी विशेषतः वृद्धावस्थेत दूध हे खूप महत्वाचे आहे. यामुळेच आरोग्य तज्ज्ञ दूध पिण्याचा सल्ला देत असतात. जी मुले दूध पिणयास नकार देतात, त्यांना दूध पाजणे पालकांसाठी रोजची डोकेदुखी ठरते.
दुधाचे हे आहेत फायदे
- दूध हे एक पौष्टिक अन्न आहे,
- दुधामध्ये ते सर्व घटक असतात जे मुलाच्या निरोगी शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी उपयुक्त असतात.
- दूध हे पोषक तत्वांचा नैसर्गिक स्रोत आहे, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्याची आवश्यकता नाही.
- दूध प्यायल्याने दीर्घकाळ शक्ती राहते.
- दूध कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, पोटॅशियम आणि इतर खनिजे प्रदान करते. त्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.
- बाळाला दूध कसे द्यावे?फक्त दूध देऊन कॅल्शियमची कमी पूर्ण केली पाहिजे असे नाही. त्यामुळे सरळ दुधापासूनच सुरुवात करू नका. त्याऐवजी तुम्ही दही, तूप, ताक किंवा पनीरही मुलांना देऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही पालक, नाचणी, स्प्राउट्स चाट, ब्रोकोली देखील मुलाला देऊ शकता. जर मुलाने या गोष्टी प्रेमाने खाल्ल्या, तरीही त्याला पुरेसे कॅल्शियम मिळते.
दूध देण्याची सर्वोत्तम वेळ ठरवा :हळूहळू एका लहान आकर्षक कप किंवा सिपरमध्ये कमी प्रमाणात दूध देणे सुरू करा. मुले रंगीबेरंगी किंवा त्यांच्या आवडत्या कार्टून कपने आकर्षित होतात आणि लगेच दूध पितात. त्यांना दूध देताना तुम्ही स्वतःही दूध प्यायला घ्या. मुले अनेकदा मोठ्यांची कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला दूध पिताना पाहून तेही तुमच्यासारखे दूध पिण्याचा प्रयत्न करेल. मुलासाठी दुधाचे फायदे कार्टून व्हिडिओ दाखवा. लहान मुले अशा व्हिडिओंमुळे प्रभावित होतात. त्यांची कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा बाळांना खरोखर भूक लागते तेव्हा त्यांना दूध देण्याची वेळ ठरवा. दूध देण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळची वेळ आहे. दूध देताना त्यांना शिव्या देऊ नका किंवा मारू नका. असे केल्याने ते दुधाचा तिरस्कार करू शकतात. काजू किंवा कोणत्याही प्रकारचे मिश्रण घालून दुधाची चव बदला. दूधही दुप्पट पौष्टिक असेल आणि मुलालाही ते आवडेल. जर मुलाला चॉकलेट आवडत असेल तर दुधात गूळ टाका आणि मुलाला दाखवा की ते एक प्रकारचे चॉकलेट आहे. ते आनंदी होतील आणि काही वेळात दुधाचा ग्लास संपवतील.
दुधाची कमतरता भरून काढू शकता :मुलाला स्वयंपाकघरात तुमच्यासोबत उभे करून दूध बनवायला सांगा. यामुळे त्यांना जबाबदारीची जाणीव होईल. तुम्हाला पाहून ते स्वतःसाठी दूध तयार करून पितील. कोणत्याही फळामध्ये दूध मिसळून स्मूदी, शेक किंवा कस्टर्ड बनवून मुलांना देता येईल. मूल दूध पीत नसेल तर काळजीची बाब नाही. आजकाल असे बरेच पर्याय आहेत, ज्याद्वारे तुम्ही मुलामध्ये दुधाची कमतरता भरून काढू शकता.
हेही वाचा :
- Benefits of saffron for skin : चमकदार त्वचेसाठी या प्रकारे वापरा केशर; आठवडाभरात दिसून येईल फरक
- Hiccups Causes : कोणी आठवण काढल्यावर तुम्हाला खरोखर उचकी लागते का ? की आणखी काही कारण....
- Egg vs Milk : प्रोटीनसाठी काय चांगले अंडे की दूध, घ्या जाणून....