महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Childhood Pneumonia Higher Death Risk : बालपणीचा न्यूमोनिया नागरिकांना ठरू शकतो धोकादायक, लिन्सेटचा धक्कादायक दावा - अकाली मृत्यू

बालपणी श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांचा अकाली मृत्यू होण्याचा धोका जास्त असल्याचा दावा लिन्सेटच्या संशोधनातून करण्यात आला आहे. बालपणी न्यूमोनिया झालेल्या ९३ टक्के नागरिकांचा अकाली मृत्यू झाल्याचेही लिन्सेटच्या या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Childhood Pneumonia Higher Death Risk
संग्रहित छायाचित्र

By

Published : Mar 8, 2023, 4:20 PM IST

लंडन : बालपणी झालेल्या न्यूमोनियाच्या आजारामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात धोका असल्याचा अहवाल लिन्सेटने दिला आहे. बालपणीच्या न्यूमोनियामुळे २६ ते ७३ वयोगगटातील नागरिकांचा मृत्यू होण्याचा धोका असल्याचे लिन्सेटने प्रकाशीत केलेल्या अहवालात नमूद केले आहे. नागरिकांच्या अकारण निधन होण्याची कारणे अगीद किरकोळ असल्याचेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. बालपणी न्यूमोनिया झालेल्या नागरिकांना ९३ टक्के मृत्यूचा धोका असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

न्यूमोनियाने २०१७ मध्ये झाला 3.9 दशलक्ष नागरिकांचा मृत्यू :न्यूमोनियामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याचे सध्या दिसत आहे. 2017 मध्ये अंदाजे 3.9 दशलक्ष नागरिकांचा न्यूमोनियामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे न्यमोनिया ही सार्वजनिक आरोग्याची एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. जगभरातील एकूण मृत्यूंपैकी 7 टक्के मृत्यू न्यूमोनियामुळे होतात असा दावा संशोधकांनी केला आहे. क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) मुळे यापैकी बहुतेक मृत्यू झाल्याचे या संशोधकांनी स्पष्ट केले आहे. बालपणी झालेला न्यूमोनिया नागरिकांच्या फुफ्फुसाच्या कार्यात बिघाड निर्माण करतो, त्यामुळे दमा आणि आजाराशी त्यांचा संबंध असल्याचे यातून स्पष्ट होते. मात्र नागरिकांच्या अकाली मृत्यूशी याबाबतचा संबंध आहे की नाही हे पूर्वी अस्पष्ट होते असाही दावा संशोधकांनी केला आहे.

बालपणीच्या श्वसनाच्या आजाराचा होतो परिणाम :बालपणात होणाऱ्या श्वसनाच्या आजाराचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचा दावा लंडन येथील इंपीरियल कॉलेजचे प्राध्यापक आणि या संशोधनाचे संशोधक जेम्स अॅलिन्सन यांनी केला आहे. नागरिकांना श्वसनाच्या आजाराने अकाली मरण पत्करावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धूम्रपानामुळेही नागरिकांचा अकाली मृत्यू होण्याचे एक कारण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जगभरातील ८ टक्के नागरिकांचा श्वसनाच्या आजाराने मृत्यू :लिन्सेटने हा अहवाल बनवताना द नॅशनल सर्व्हे ऑफ हेल्थ अँड डेव्हलपमेंट वापरला आहे. त्यानुसार बालपणात झालेल्या न्यूमोनियाच्या आजारामुळे नागरिकांना मृत्यूचा धोका असल्याचे दिसून येत असल्याचे जेम्स अॅलिन्सन यांनी यावेळी स्पष्ट केले. या अभ्यासात द नॅशनल सर्व्हे ऑफ हेल्थ अँड डेव्हलपमेंटचा डेटा वापरला आहे. त्यानुसार 1946 मध्ये जन्मावेळी व्यक्तींची मोजणी करुन 2019 पर्यंतच्या आरोग्य आणि मृत्यूच्या नोंदी तपासल्या गेल्या. त्यातील 3 हजार 589 सहभागी नागरिकांपैकी 25 टक्के दोन वर्षापूर्वी श्वसनाच्या आजाराने ग्रस्त होते, तर 2019 च्या अखेरीस यापैकी 73 वर्षे वयाच्या आधी तब्बल 19 टक्के नागरिक मरण पावले होते. या 674 अकाली प्रौढ मृत्यूंपैकी 8 टक्के नागरिकांचा मृत्यू श्वसनाच्या आजाराने झाला होता. त्यातील बहुतेक नागरिकांना बालपणात श्वसनाचा आजार असल्याचा दावा या अहवालातून करण्यात आला आहे.

हेही वाचा - Negative Emotions Bring Success : आराम, आनंदातून नव्हे तर चिंता आणि रागातून येते यश मिळवण्याची उर्जा

ABOUT THE AUTHOR

...view details