उत्तराखंड येथील चौकोरी हे हिमालायाच्या कुशीत वसलेले नंदादेवी, नंदा कोट आणि पंचाचुलीच्या शिखरांनी वेढलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे. येथील नयनरम्य दृश्य आणि मंदिर हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
चौकोरी हे रस्ते मार्गाने जोडले आहे, त्यामुळे ते जगभारातील पर्यटकांना आकर्षित करते. येथील उल्का देवी आणि घनसेरा मंदिर हे देवी - देवतांच्या शिल्पकला आणि कोरीव कामांसाठी ओळखले जाते. हे मंदिर आध्यातमिक कारणांमुळे देखील भाक्तांना आणि साधकांना त्याच्याकडे आकर्षित करते.
येथे हिमालयाच्या कुशीतील हिरव्या सुंदर चहाच्या बाग डोळ्यांना सुखद गारवा देतात. बर्फाने आच्छादलेल्या शिखरांतून जेव्हा सूर्योदय होतो तेव्ह पृथ्वीच नाही तर, आकाशातही मुक्त रंगांची उधळण झाल्याचे वाटते. येथील प्रत्येक दृश्य शांती देत असल्याचे तुम्हाला वाटेल.
उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज सांगतात की, उंच हिमालयाचे दृश्य, नंदा देवी, नंदा कोट आणि पंचचुली शिखर यांमुळे पर्यटक चौकोरीला पसंती देतात. राज्य आणि चौकोरी सारख्या ठिकाणांवरील रहिवाशांना चांगल्या आर्थिक संधींसाठी पर्यटनाला प्रोत्साहन देणे हे आमच्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. मी येणाऱ्या पर्यटकांना आवाहन करतो की त्यांनी कोविड नियमांचे पालन करावे आणि आवश्यक कागदपत्रांसह यावे.
या ऑफबीट स्थानांच्या विकासाबाबत पर्यटन सचिव दिलीप जावलकर म्हणाले की, आम्ही उत्तराखंडमध्ये ऑफबीट लोकेशन विकसित करण्यासाठी सतत काम करत आहोत. आमचे पर्यटन सर्किट या स्थळांना लोकप्रिय बनवत आहे आणि या ठिकाणांवर अधिक पर्यटक आणत आहे. हे अधिक पर्यटकांना आकर्षित करत आहे, जे ग्रामीण अर्थव्यवस्थेला देखील नियंत्रित करत आहे.