हैदराबाद :वातावरणातील बदल झाल्याने त्याचा आपल्या शरीरावर विपरित परिणाम होतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजणांना वातावरणातील बदलांचा त्रास होऊ शकतो. तापमानातील बदल, अवकाळी पाऊस, तापमान आदींमुळे विविध समस्या निर्माण होतात. त्यामुळे विविध आजारांनाही आमंत्रण मिळते. तंदुरुस्त राहणे, दिनचर्या पाळणे आणि पौष्टिक आहार घेणे ही निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे. परंतु कोणतेही आजार झाल्यास अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. बदलत्या ऋतूमध्ये कसा बचाव करावा, याबाबतच्या काही टीप्स आम्ही तुमच्यासाठी देत आहोत, त्या तुम्ही वापरून पाहू शकता.
भरपूर पाणी प्या :चहा किंवा थंड पेय पिण्यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम करु शकते. त्यामुळे पाण्याला पर्याय नाही. शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे, त्यामुळे कोणत्याही आजाराचा सामना करण्याची वेळ येत नाही. पाणी केवळ आपल्या संपूर्ण शरीराला हायड्रेट करत नाही, तर ते सर्व साचलेल्या विषारी पदार्थांना बाहेर काढते.
नियमित व्यायाम करा :तुम्ही कितीही व्यस्त असले तरी व्यायामासाठी थोडा वेळ नक्की काढा. तुम्हाला जिममध्ये जाता येत नसले तरी काही कामांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवा. शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यामुळे नियमित व्यायाम करा.