हैदराबाद : या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिलला होणार असून ते भारतात दिसणार नाही. मात्र सूर्यग्रहणानंतर वर्षातील पहिले चंद्रग्रहणही या वर्षात होणार आहे. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी या घटनेला ज्योतिषशास्त्रातही मोठे महत्व आहे. पाच मेच्या दिवशी बौद्ध पौर्णिमा आणि चंद्रग्रहण या दोन्हीचा योगायोग येणार आहे.
कधी आहे वर्षातील पहिले चंद्रग्रहण :वर्षातील पहिले सूर्यग्रहण या 20 एप्रिलला असल्याने नागरिकांना सूर्यग्रहणाबाबतची उत्सुकता लागली आहे. त्यासह नागरिक चंद्रग्रहण कधी आहे, याबाबतही उत्सुकतेने विचारत आहेत. अनेक नागरिकांना सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणांचा आपल्या राशीवर परिणाम होत असल्यावर प्रचंड विश्वास वाटतो. त्यामुळे नागरिक त्याविषयी मोठ्या उत्सुकतेने माहिती शोधत आहेत. या वर्षातील पहिले चंद्रग्रहण 5 मेच्या दिवशी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशीच होणार आहे. त्यामुळे 5 मेला वर्षातील पहिले चंद्रग्रहण शुक्रवारी रात्री 08.45 मिनीटाला सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी अर्थात 6 मेला सकाळी 01.00 वाजता या चंद्रग्रहणांची सांगता होणार आहे.