हैदराबाद : हिंदू धर्मात चैत्र पौर्णिमेला विशेष महत्व असल्याने ही पौर्णिमा महिलांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. चैत्र महिन्यातील पौर्णिमेला देशभरात उत्साहाचे वातावरण असते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या भक्तीभावाने चंद्राची पूजा करण्यात येते. चैत्र पौर्णिमा ही हिंदू नववर्षातील पहिली पौर्णिमा असल्याचे मानण्यात येते. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे. मात्र हनुमान यांचा जन्म चैत्र पौर्णिमेला झाल्यामुळे हनुमानांचीही विधीवत पूजा करण्यात येते.
कधी आहे चैत्र पौर्णिमेचा मुहुर्त :यावर्षी चैत्र पौर्णिमा 5 एप्रिलच्या सकाळी 09.19 वाजता सुरू होऊन ती सहा एप्रिलच्या 10.04 सकाळपर्यंत असणार आहे. त्यामुळे चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने सगळ्यांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचला आहे. 6 एप्रिलला हनुमान जयंती असल्याने नागरिक चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती असा सलग सण साजरा करण्याच्या तयारीत आहेत. चैत्र पौर्णिमेला चंद्राची पूजा करण्यात येते. यावर्षी चैत्र पौर्णिमेचा शूभ मुहुर्त सायंकाळी 06.01 मिनीटांनी आहे. चंद्रोदय 06.01 मिनीटाने होणार असून त्याचवेळी चंद्राची पूजा करण्यात येते. यावेळी चंद्राला नैवेद्य दाखवून त्याची आरती करण्यात येते. त्यासह