महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

स्तनपानामुळे बाळांचा विविध आजारांपासून होतो बचाव - breastfeeding advantages

स्तनपान हे बाळाला दिले जाणारे सर्वात आरोग्यदायी आणि निरोगी अन्न आहे. बर्‍याचदा हे बाळासाठी ‘अमृत’ म्हणून संबोधले जाते, बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने याचे अनेक फायदे आहेत. एटीव्ही भारतच्या सुखीभवच्या तज्ज्ञांनी प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीशास्त्रज्ञ डॉ. राजश्री काटके यांच्याशी यासंबंधी संवाद साधला.

Breastfeeding
स्तनपान

By

Published : Aug 2, 2020, 1:22 PM IST

दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट दरम्यान ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ साजरा केला जातो. यावर्षी २०२० मध्ये “निरोगी ग्रहासाठी स्तनपानाला पाठींबा द्या” अशी थीम निवडण्यात ठरवली आहे. स्तनपान हे बाळाला दिले जाणारे सर्वात आरोग्यदायी आणि निरोगी अन्न आहे. बर्‍याचदा हे बाळासाठी ‘अमृत’ म्हणून संबोधले जाते, बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने याचे अनेक फायदे आहेत. एटीव्ही भारतच्या सुखीभवच्या तज्ज्ञांनी प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीशास्त्रज्ञ डॉ. राजश्री काटके यांच्याशी यासंबंधी संवाद साधला. डॉ. काटके या ओबीजीवायच्या संचालक, एफआयसीओजी, एफएमएएस, प्रसुतीशास्त्र व स्त्रीरोग विषयाच्या प्राध्यापक तसेच मुंबई येथील कॅमा ॲण्ड अ‍ॅलब्लेस रुग्णालयाच्या माजी व्यवस्थापक आहेत.

स्तनपान देण्याचे फायदे काय आहेत?

आईचे दूध हे नवजात मुलांचा परिपूर्ण आहार असतो. आईचे दूध हे बाळासाठी अमृतसारखे असते. यामध्ये असलेल्या इम्युनोग्लोबुलिन्समुळे नवजात बाळ मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या विविध आजारांशी सक्षणपणे लढू शकतात. यामुळे श्वसनाचे आजार न्यूमोनिया आणि इतर संसर्गजन्य आजार होण्याचा धोकाही कमी होतो.

आईचे दूध हे पौष्टिकतेने परिपूर्ण असते. ज्यामध्ये पाणी, कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि सहज पचण्यायोग्य फॅट्स असतात. आईच्या दुधात मिनरल्स, कॅल्शियम आणि लोह (आइअन्) देखील असते, जी बाळाची वाढ करण्यास सर्वात जास्त फायदेशीर असते.

बाळाला याचे काय फायदे होतात?

  1. बाळाचे आईशी भावनिक बंध अधिक घट्ट होतात. तसेच त्यांचे भावनिक बंध अधिक घट्ट झाल्याने जीवनामध्ये त्यांच्यात अधिक ममत्व निर्माण होते.
  2. ज्या बाळांना आईचे स्तनपान दिले जाते, अशा बाळांची बौधिक क्षमता प्रचंड असते.
  3. आईच्या दुधामुळे बाळाचे वजन फॉर्म्युला फीडच्या तुलनेत अधिक निरोगी मार्गाने वाढते.
  4. स्तनपान दिलेल्या मुलांना सहसा बद्धकोष्ठता येत नाही.
  5. बाळाला श्वसन संक्रमण, जुलाब आणि कानाच्या विकारापासून संरक्षण मिळते. तसेच विविध ॲलर्जीपासूनही संरक्षण मिळते.

बाळांना किती वेळा स्तनपान द्यावे?

जेव्हा जेव्हा बाळाला भूक लागेल, तेव्हा तेव्हा आपण बाळाला स्तनपान द्यायला हवे. याला आपण “डिमांड फीडिंग” असं म्हणतो. ते सहसा दर दीड ते तीन तासांनी द्यायला हवे. पण आपण बाळाला स्तनपान घ्यायला भाग पाडू नये.

नवजात बाळाला सुरुवातीचे सहा महिने केवळ स्तनपानच द्यायला हवे. तसेच बाळाला अतिरिक्त पाणी किंवा “ग्रीप वॉटर” किंवा “गुट्टी” देऊ नये. कारण आईचे दूध बाळासाठी परिपूर्ण असते. आईच्या दुधात पाण्याचे प्रमाणही पुरेसे असते, त्यामुळे अतिरिक्त पाणी देण्याची गरज नसते. त्याचबरोबर योग्य ती स्वच्छता न ठेवल्यास ६ महिन्यांपर्यंतच्या बाळाला विविध संसर्ग होऊ शकतात. आईच्या दुधाने बाळ समाधानी असेल, तर ते शांत होतात आणि त्यांना चांगली झोप येते. जर बाळ सातत्याने रडत असेल तर दुध स्त्रावाच्या कमतरतेची तपासणी करून घ्यायला हवी.

आईला कोरोना विषाणूचा संसर्ग असेल तर बाळासाठी स्तनपान देणे योग्य आहे का?

आईला जर कोरोनाची लागण असेल, तर ती विशिष्ट गाऊन आणि मास्क परिधान करुन बाळाला स्तनपान देवू शकते. कोवीड संसर्ग असला तरी तान्ह्या बाळाचे आईसोबतचे बाँडीग तसेच राखले पाहिजे. सोबतच आई तिचा उपचारही घेऊ शकते.

महत्त्वाचे मुद्दे:

बाळाला जर ताप किंवा डायरिया असेल तरीही तुम्ही बाळाला स्तनपान देवू शकता.

आईने स्तनपान देताना बाळाचे तोंड निप्पल (स्तनाग्र) आणि ॲरोलाभोवती व्यवस्थित धरले का? याची काळजी घ्यावी. स्तनपान देताना बाळाला योग्यरित्या धरून ठेवले आणि निप्पल आणि ॲरोलाचा भाग थेट बाळाच्या तोंडात ठेवला, तर तिथे निप्पल सकींग (nipple sucking) होणार नाही.

बाळाला मांडीवर घेऊन स्तनपान देणे ही सर्वात योग्य पद्धत आहे. तसेच आईचे सिझेरियन झाले असेल, तर ती बरी झाल्यावर नातेवाईक मुलाला स्तनपान देण्यास मदत करू शकतात. अशावेळी लवकरात लवकर स्तनपान संपवणे गरजेचे असते. बाळाला जर स्नफल्स (नाकातून आवाज येणे) असेल तर त्याला गुदमरल्यासारखे होऊ शकते. परंतु योग्य पद्धतीने स्तनपान दिले, तर बाळाला गुदमरल्यासारखे होणार नाही.

स्तनपान करताना आहार / पोषण:

अशक्त (Anemic) माताही बाळाला स्तनपान देवू शकतात. परंतु तत्पूर्वी त्यांनी बाळाला आणि स्वतः ला पुरेसे पोषक अन्न मिळतंय की नाही ? याची काळजी घ्यावी. सोबतच त्यांनी पुरेसे लोह आणि कॅल्शियमयुक्त आहार घेणे आवश्यक आहे.

कॅल्शियम सप्लिमेंटमुळे स्तनपान देणाऱ्या मातांना सांधेदुखीच्या वेदना कमी होतात. उडद किंवा काळा हरभराच्या आहारात समावेश केल्याने सांधे दुखीचा त्रास कमी होतो. तसेच मेथी, नाचणीने बनवलेले पॉरिज स्तनात दुध निर्माण करायला मदत करतात. शिवाय घरी शिजवलेले ताजे अन्न आईसाठी चांगला संतुलित आहार असू शकतो.

ABOUT THE AUTHOR

...view details