हैदराबाद: हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यामुळे ब्लडप्रेशर वाढून हाय बीपी असणाऱ्यांना झटका येण्याची शक्यता सर्वाधिक असते. थंडीत शरीरात रक्ताच्या गुठळ्या होतात आणि हृदयविकाराचा झटका येतो. (heart attack can occur as the cold increases)
हार्ट अटॅक आल्यावर काय करावे (Heart attack first aid tips) :1.आपल्या मदतीसाठी कोणाला तरी बोलावून घ्यावे.2. धावपळ व जास्त हालचाल करू नका. 3. तातडीने 108 ह्या नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी. 4. अॅस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट ही गोळी जवळ असतील तर ती गोळी घेऊन जिभेखाली ठेवावी. या गोळ्यांमुळे रक्त पातळ होते व रक्तवाहिन्यातील अडथळा दूर होतो. त्यामुळे ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा हृद्याच्या स्नायुंना होतो.
5. रुग्णावर सीपीआर उपाय करावेत. यामध्ये पेशंटला दुसरी एखादी व्यक्ती आपल्या तोंडाने कृत्रिम श्वासोच्छवास देते व बाहेरून हृदयाला छातीवर दाब दिला जातो. रुग्णवाहिका येइपर्यंत हे उपाय करत राहावेत. 6. रक्तवाहिनीतील अडथळा दूर करण्यासाठी आपले डॉक्टर निदान करून रुग्णाची स्थिती, गुंतागुंतीची शक्यता विचारात घेऊन अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करण्याचा निर्णय घेतील.
हार्ट अटॅक येण्याची कारणे (Causes of Heart attack) :1. प्रामुख्याने बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, धकाधकीचे जीवन, मानसिक ताणतणाव आणि अयोग्य आहारामुळे आज हृद्यविकार आढळत आहे. 2. हृदयास रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतीभोवती चरबी, कोलेस्टेरॉल व तत्सम पदार्थांचा संचय होतो व त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद बनतात. 3. ऑक्सिजन आणि रक्ताच्या कमतरतेमुळे हृद्याचे स्नायुमधील पेशी मृत होऊ लागतात परिणामी हार्ट अटॅक येतो.
4. कुटुंबामध्ये हृद्यविकारासंबंधी अनुवंशिकता असणे. 5. मधुमेह, धमनीकठिण्यता, उच्च रक्तदाब असे आजार असणे. 6. रक्तातील बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असणे. 7. वजन जास्त असणे. 8. तंबाखू, सिगारेट, अल्कोहोल यासारखी व्यसने करणे, ही सर्व करणे हार्ट अटॅक येण्यासाठी जबाबदार ठरतात. 9. जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या, तंतूमय पदर्थ, फळे कमी खाण्याची सवय.