महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Benefits Of Makhana : मखाना खाण्याचे आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या - food for health

Benefits Of Makhana : मखाना आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण त्यात अनेक प्रकारचे पौष्टिक घटक असतात. मखाना नियमित खाल्ल्यानं पचनक्रिया मजबूत होते. याशिवाय वजन कमी करण्यासाठी आणि अ‍ॅनिमियावर मात करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. जाणून घ्या मखाना खाण्याचे इतर फायदे.

Benefits Of Makhana
मखाना

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 12:41 PM IST

हैदराबादBenefits Of Makhana :शरीराला अनेक प्रकारची जीवनसत्त्वं आणि पोषक घटकांची गरज असते. यासाठी विविध प्रकारचे पदार्थ आवश्यक असतात. त्याचप्रमाणं मखानाचं सेवन आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. शरीराला बळकट करण्यासाठी, अशक्तपणा दूर करण्यासाठी आणि अनेक रोगांपासून संरक्षण करण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला मखानाचे फायदे सांगत आहोत.

पोषक तत्वांनी समृद्ध :मखानामध्ये पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. यात केवळ प्रथिने आणि फायबरच नाही तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस देखील भरपूर प्रमाणात आहे. अशाप्रकारे हाडे निरोगी ठेवण्यास, रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि कोलेस्टेरॉलची पातळी राखण्यास देखील मदत करते. मज्जातंतूंच्या कार्यामध्ये आणि स्नायूंच्या आकुंचनासाठी देखील हे खूप फायदेशीर आहे.

पचनक्रिया मजबूत करते: मखानामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे ते निरोगी अन्नाच्या श्रेणीमध्ये समाविष्ट केलं गेलं आहे. मखानामध्ये मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ट्यूमर गुणधर्म असतात आणि ते पचनसंस्था सुधारण्यास आणि शरीराला बळकट करण्यासाठी खूप मदत करतं. मखाना खाण्यामुळे पचनक्रिया मजबूत होते.

हृदयासाठी फायदेशीर: मखानामध्ये मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे हृदयासाठी फायदेशीर मानलं जातं. जर तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये मखानाचा समावेश केला तर हृदयाशी संबंधित समस्यांमध्ये ते फायदेशीर ठरतं. त्यामुळे हृदय निरोगी राहातं. हे नियमित खाल्ल्यानं रक्तदाबही नियंत्रित राहतो.

वजन कमी करण्यास फायदेशीर :मखाना नियमित खाल्ल्यानं वजन कमी होते. तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर रिकाम्या पोटी मखाना खा. मखानामध्ये असलेले घटक वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. सकाळी रिकाम्या पोटी मखाना खाल्ल्यानं पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे दिवसभराची भूक कमी होते. यामुळे शरीरातील पोषक घटकांची कमतरता देखील दूर होते.

साखरेची पातळी नियंत्रित राहाते : रिकाम्यापोटी मखाना खाल्ल्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहाते. मखाना हे मधुमेही रुग्णांसाठी उत्तम अन्न मानलं जातं. रोज सकाळी हे खाल्ल्यानं रक्तातील साखर नियंत्रणात राहाते.

हेही वाचा :

  1. Yoga For Acidity : 'ही' योगासनं तुम्हाला देतील अ‍ॅसिडीटी आणि गॅसच्या समस्येपासून त्वरित आराम
  2. Jeera Water Benefits : एक कप जिऱ्याचे पाणी तुम्हाला बनवेल तंदुरूस्त; सकाळी अनोशा पोटी पिल्याने होतात हे फायदे.....
  3. Benefits Of Potatoes : बटाटे आहेत आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या फायदे..

ABOUT THE AUTHOR

...view details