हैदराबाद : रोजच्या आहारात बीट रूटचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी6, आयर्न, फायबर, फोलेट, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, झिंक इत्यादी पोषक घटक आपल्याला अनेक आजारांपासून वाचवतात. अनेक पोषक तत्वांनी समृद्ध बीटरूटमुळे केवळ आपले आरोग्यच नाही तर त्वचेचे सौंदर्य देखील सुधारते. व्हिटॅमिन सी असल्यानं त्ववेचे विकार कमी होतात.
- पिंपल्स दूर करा : दोन चमचे दह्यात दोन चमचे बीटरूटचा रस घालून मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. अर्धा तास कोरडे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा पॅक आठवड्यातून तीन वेळा लावल्याने पिंपल्स आणि त्यांच्या डाग दूर होतील.
- त्वचा चमकदार होईल : बीटरूटचा रस चेहऱ्यावर लावून दररोज दहा मिनिटे मसाज केल्यास चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जातील. चेहरा चमकदार होईल. याशिवाय एक चमचा तांदळाच्या पिठात एक चमचा सफरचंदाचा थर, दोन चमचे बीटरूटचा रस, एक चमचा तिळाचे तेल घालून हे मिश्रण चांगले मिसळा. आंघोळ करताना शरीरावर लावल्यास मृत पेशी निघून जातील. तुमची त्वचा चमकदार होईल.
- काळे डाग काढून टाका : काही लोकांच्या चेहऱ्यावर विविध कारणांमुळे काळे डाग पडतात. या समस्येने त्रस्त असलेल्यांनी बीटरूटचा रस आणि टोमॅटोच्या रसाचे थोडेसे मिश्रण करून डागांवर लावावे. पूर्ण कोरडे झाल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.
- काळी वर्तुळे :तणाव आणि झोप न लागणे यासारख्या समस्यांमुळे डोळ्यांभोवती काळी वर्तुळाची समस्या अनेकांना भेडसावते. अशा लोकांनी बीटरूटच्या रसात कापूस बुडवून पापण्यांवर आणि डोळ्याभोवती लावावा. काही वेळाने चेहरा धुवा. असे सतत केले तर काळी वर्तुळे निघून जातील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- गुलाबी ओठांसाठी : अनेकांना त्यांचे ओठ हलके गुलाबी रंगाचे असावेत असे वाटते. अशा लोकांनी आठवड्यातून दोनदा बीटरूटच्या रसात थोडी साखर मिसळावी. या मिश्रणाने ओठांना हलक्या हाताने मसाज करावा. असे केल्याने आरोग्याला फायदा मिळतो.