हैदराबाद :आपले शरीर म्हणजे एक चमत्कारिक यंत्रच आहे. भूक लागल्याशिवाय जेवू नये आणि तहान लागल्याशिवाय पाणी पिऊ नये. अनेकजण उगाचंच तहान लागलेली नसली तरीही सतत पाणी पितच राहतात. हे शरीराच्या रचनेविरूध्द आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की घशाला कोरड पडेपर्यंत वाट बघावी. असे केल्यामुळे कधी कधी गंभीर समस्या उद्भवू शकतात. (Health Tips)
सकाळी रिकाम्यापोटी :अनेकांचा असा समज असतो की, सकाळी उठल्यावर अनुशापोटी (Empty stomach in the morning)म्हणजे पोट रिकामे असताना भरपूर पाणी प्यावे. हे अगदी चूक आहे. रिकाम्या पोटी जास्तीत जास्त एक लिटरपर्यंत पाणी प्यावे. अनुशापोटी पाणी पिणे लाभकारक असले तरीही लिटरच्या लिटर पाणी पिणे असा त्याचा अर्थ नाही. तसेच गार पाण्याऐवजी कोमट पाणी प्यायले तर आरोग्याच्या दृष्टिने ते जास्त लाभकारक ठरेल.
झोपण्यापूर्वी : अनेकांना झोपण्यापूर्वी (before sleep) पाणी, ग्रीन टी, चहा, कॉफी असं काहीतरी पिण्याची सवय असते. मात्र झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास तरी पोटात कुठलाही द्रवपदार्थ जाऊ देऊ नये. झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने झोपेत व्यत्यय येतो. जास्त वेळा लघवीला जाण्याच्या शक्यता निर्माण होतात. म्हणूनच झोपण्यापूर्वी अर्धा तास पोट रिकामे असावे.
लघवीला रंग नसेल तर : आपण योग्य प्रमाणात पाणी पित आहोत की नाही? याची सोपी टेस्ट म्हणजे, लघवीचा रंग तपासणे(If the urine is colorless) . जर तो फिका पिवळट असेल तर आपण योग्य प्रमाणात पाणी पित आहोत. जर लघवीला रंगच नसेल आणि ती पाण्यासारखीच पारदर्शक असेल, तर मात्र पाण्याचे अतिरिक्त सेवन होत आहे. अर्थात हे सातत्याने होणे योग्य नाही. पाण्याच्या अतिसेवनामुळे सोडियमची कमतरता जाणवू लागते आणि कधी कधी ह्रदविकाराचा झटका येण्याची शक्यताही असते.
व्यायाम करत असताना : तज्ज्ञांच्या मते व्यायामाच्या दरम्यान पाणी प्यायल्याने त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता बळावते. व्यायाम करत असताना (While exercising) शरीराचे तापमान वाढलेले असते. व्यायामा दरम्यान तहान लागलीच तर दरम्यान भरपूर पाणी न पिता घोट घोट पाणी प्यावे.