हैदराबाद : बहुतांश लोक केळी खातात, परंतु सहसा खाल्यानंतर त्याची साल निरुपयोगी समजून फेकून देतात. जर तुम्हीही ही चूक करत असाल तर आतापासून चुकूनही करू नका. केळीची साल केवळ त्वचेचे सौंदर्यच वाढवत नाही तर हात आणि पायांची त्वचा देखील निरोगी ठेवते. केळीची साल पायांच्या त्वचेवर लावल्यास त्वचा स्वच्छ होते. पायातील घाण काढता येते. पेडीक्योरसाठी तुम्ही केळीची साल देखील वापरू शकता. केळीच्या सालीनं पेडीक्योर केल्यानं त्वचा मऊ आणि स्वच्छ होते. पाय स्वच्छ ठेवण्यासाठी केळीच्या साली लावण्याचे फायदे आणि योग्य पद्धत जाणून घ्या.
Banana peel pedicure : केळीच्या सालीचा करा असा उपयोग; घरच्या घरी करा अशा प्रकारे पेडीक्योर - pedicure at home
Banana peel pedicure : अनेकदा हिवाळ्यात पायाच्या टाचांना भेगा पडतात. पाय खूप कोरडे होतात. अशा स्थितीत तुम्ही घरी सहज पाय स्वच्छ ठेवू शकता. यासाठी केळीच्या सालीनं पेडीक्योर करून पहा. पायातील घाण दूर करण्यासाठी आणि त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी हा अतिशय स्वस्त घरगुती उपाय आहे.
केळीच्या सालीचा करा असा उपयोग
Published : Oct 25, 2023, 4:10 PM IST
केळीच्या सालीनं असं करा पेडीक्योर :अनेकदा महिला हात-पायांचं मॅनिक्युअर आणि पेडीक्योर करण्यासाठी अनेक महागडे पदार्थ वापरतात. पेडीक्योर करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्येही जातात. खूप खर्च न करता पेडीक्योर करण्याचा एखादा सोपा घरगुती उपाय करून पहा. जर तुम्ही केळी खात असाल तर आतापासून त्याची साल फेकून देऊ नका, त्याऐवजी तुमचे पाय पेडीक्युअर करा.
- प्रथम आपले पाय स्वच्छ करा. आता केळीच्या सालीनं पायाची त्वचा नीट चोळा. याच्या नियमित वापरानं तुमच्या पायातील मृत त्वचेच्या पेशी आणि घाण निघून जाईल. तुमचे पाय स्वच्छ दिसतील.
- महिलांना हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्याचा त्रास होतो. केळीची साले टाचांवर चोळून काही वेळ तशीच राहू द्या. नंतर टाच पाण्यानं स्वच्छ करा. हे नियमित केल्यानं तुम्हाला फायदे दिसतील. टाचा मऊ होतील.
- केळीच्या सालीवर थोडासा बेकिंग सोडा टाका आणि त्यावर पाय चोळा. बेकिंग सोडा क्लिनिंग एजंट म्हणून काम करतो. आता अर्ध्या बादली पाण्यात थोडासा बेकिंग सोडा टाका आणि मिक्स करा. त्यात पाय बुडवून मग बाहेर काढा. टॉवेलने पुसून घ्या आणि क्रीम किंवा मॉइश्चरायझर लावा.
- केळीची साल, दही, मध मिक्सरमध्ये घालून बारीक करा. ही पेस्ट पाय आणि घोट्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या. नंतर कोमट पाण्यानं पाय स्वच्छ करा. तळवे आणि त्वचेला कोरडे होण्यापासून वाचवण्यासाठी थोडे तेल किंवा मॉइश्चरायझर लावा.
हेही वाचा :