हैदराबाद :डोकेदुखी असेल तर चमेलीच्या मूळांचा काढा करुन त्याचा परिषेक करतात. शिरःशूल चक्कर येणे अथवा मानसिक दौर्बल्यात चमेली तेलाने डोक्याला मालिश केल्याने आराम (asmine is beneficial for health) मिळतो.
तळपाय पुन्हा मऊ व प्राकृत होतात : थंडीमुळे किंवा पाण्यात सतत काम करण्याने तळपायाला भेगा पडतात. अशावेळी चमेलीची पाने वाटून लेप भेगांवर लावावा जखमा लवकर भरतात. चमेलीपत्र सिद्ध तेलाने हळूहळू मालीश करावी. त्यामुळे तळपाय पुन्हा मऊ व प्राकृत (Ayurvedic Benefits of Jasmin) होतात.
चमेली पत्र वाटून त्याचा लेप लावावा (Apply Jasmine Paste) : चमेलीची पाने उत्तम व्रणरोपक म्हणजेच जखमा भरून काढते. चमेलीपत्रसिद्ध तेल लावावे. चमेलीपत्र कुष्ठघ्न आणि कण्डूघ्न सांगितले आहे. शरीरावर खाज सुटत असेल किंवा त्वचारोग असेल तर चमेली पत्र वाटून त्याचा लेप लावावा. खाज सुटणे कमी होते. अनेक त्वचारोग उदा. एक्जीमा, फंगल इन्फेक्शन इ. मधे चमेलीपत्रसिद्ध तेल अथवा पानांच्या मूळाचा लेप लाभदायक ठरतो.
चमेलीच्या फुलांचा सुगंध घेतल्यास स्ट्रेस कमी होतो : अतिकाम किंवा कमी झोप यामुळे चिडचिडेपणा मानसिक अस्वस्थता जाणवते. अशावेळी चमेलीच्या फुलांचा सुगंध घेतल्यास स्ट्रेस कमी (scent of jasmine flowers reduces stress) करण्यास मदत होते. अरोमाथेरपी प्रमाणे याचा उपयोग होतो. चमेली पुष्प वाजीकर आहेत. या फुलांचा सुगंध वाजीकरण करणारा आहे.