हैदराबाद :अन्न खाल्यानंतर काही वेळाने मळमळ होणे, जळजळ होण्यास सुरूवात झाली तर ती फूड पॉइजनिंगची लक्षणे असतात. फूड पॉइजनिंग टाळण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे. काहीवेळा फूड पॉइजनिंगचा जास्त दिवस त्रास होतो तर कधीकधी ती समस्या गंभीरदेखील बनते.
- कसे होते फूड पॉइजनिंग : खराब अन्न खाल्याने हानिकारक जिवाणू, विषाणू शरीरात प्रवेश करतात. याचाच अर्थ खराब अन्न खाल्याने फूड पॉइजनिंग होते. तुम्ही कसे व कोणत्या प्रकारचे अन्न खाता यावर ते अवलंबून असते. स्वयंपाकात कांदा, टोमॅटोचा वापर केल्याने ते पदार्थ जास्त काळ चांगले राहत नाहीत. ते काही तासातच खराब होऊन जातात.
फूड पॉइजनिंगचे लक्षणे :
- उलट्या किंवा पोटदुखी :अन्न खाल्यानंतर पोटदुखी किंवा उलट्या होत असतील तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा. दूषित अन्न खाल्याने उलट्या आणि मळमळ सारख्या समस्या होऊ शकतात.
- डिहाइड्रेशन आणि अशक्तपणा : दूषित अन्न खाल्याने डिहायड्रेशन, लूज मोशनचा त्रास होतो. त्यामुळे जास्त तहान लागून तोंड पुन्हा पुन्हा कोरडे पडते. तसेच थकवा, अशक्तपणा आणि चक्कर येण्यासारख्या समस्यादेखील जाणवतात.
- ताप येणे :फूड पॉइजनिंग शरीरातील हिट वाढते. त्यामुळे आपल्याला ताप अल्यासारखे जाणवते. परंतु जर खूप ताप अल्यासारखे वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
- पोटात कळा येणे : फूड पॉयझनिंगमुळे लूज मोशन होते. हा त्रास दोन तीन दिवस होऊ शकतो. काही खाल्यानंतर पोटात जोरात कळा येत असतील किंवा पोटाभोवती गुठल्या दिसत असतील तर डॉक्टरांना संपर्क साधा.