हैदराबाद - निद्रानाश, तणाव, रोग प्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त आणि अॅनाबॉलिक गुणकारी औषध म्हणून अश्वगंधाची ओळख आहे. अश्वगंधा ही एक औषधी वनस्पती आहे. आरोग्यासंबंधीत विविध व्याधींवर या वनस्पतीचा उपयोग औषध म्हणून केला जातो. अश्वगंधा ही विंटर चेरी किंवा इंडीयन जिनसेंग म्हणून देखील ओळखली जाते. आयुर्वेदाच्या इतिहासात पीएचडी मिळवलेले आमचे तज्ज्ञ डॉ. रंगनायुकुलु यांनी याबाबत समजावून सांगताना म्हणाले की, विथनिया सोम्निफेरा (अश्वगंधा) ही सोलानासीए (Solanaceae) कुटुंबातील वनस्पती आहे. ही बारमाही वाढणारी वनस्पती आहे. औषध निर्मितीसाठी या वनस्पतीची मुळं अधिक उपयुक्त असतात. अश्वगंधा ही संपूर्ण भारतभर आढळणारी वनस्पती असून तुलनेने कोरड्या हंगामात या वनस्पतीची वाढ अधिक चांगल्याप्रकारे होते.
उपलब्धता -
डॉ. रंगनायुकुलु यांनी सांगितले की, अश्वगंधा ही वाळलेली बारीक काडी किंवा पावडरच्या स्वरुपात बाजारात कोठेही सहज उपलब्ध असते. शिवाय इतरही अन्य स्वरुपात अश्वगंधा बाजारात उपलब्ध असते. यामध्ये घृतम् (तूप), क्वठा (डेकोक्शन), अरिस्ता (अल्कोहोलची मात्रा असलेले टॉनिक), तैला (तेल), लेप (मलम), चूर्ण (पावडर), लेह्या (खाण्यायुक्त सेमीसॉलिड पदार्थ) आणि टॅब्लेट यासारखी विविध तयार उत्पादने सध्या बाजारात उपलब्ध आहेत. ही उत्पादने साधारणतः आयुर्वेदीक मेडीकल शॉपमध्ये किंवा सामान्य मेडीकल शॉपमध्येही उपलब्ध असतात.
अश्वगंधाचे फायदे -
आमच्या तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे अश्वगंधाचे काही आरोग्यदायक फायदे आहेत, ते फायदे खाली नमूद केले आहेत.
१. रिजुव्हेनेटर -
१ ते ३ ग्रॅम अश्वगंधा रूट पावडर... दूध, तूप किंवा कोमट पाण्यासोबत १५ दिवस घेतल्यास हे रिजुव्हेनेटरचे कार्य करते. त्याचबरोबर वजन वाढण्यास मदत करते.
२. किरकोळ शरीरयष्टीवर उपाय -
अश्वगंधाचा एक अंश आणि तुपाचे चार अंश शिजवून घेऊन, त्यामध्ये दुधाचे १० अंश मिसळून पिल्यास वजन वाढण्यास मदत होते.
३. इन्सोम्नीया (निद्रानाश) -
२ ते ४ ग्रॅम अश्वगंधा पावडर, साखर आणि कोमट दुधासोबत घेतल्याने निद्रानाशची समस्या दूर होते. आणि चांगली झोप येते. शिवाय चिंता, घोर आणि न्यूरोसिस सारखी लक्षणे देखील कमी होतात. अश्वगंधा ही अँटीडिप्रेससंट आणि सायकोट्रॉपिक औषधाचे कार्य करते.
४. ब्रोनकियल दमा (अस्थमा) -
अश्वगंधाची राख (अल्कली) मध आणि तूपासोबत घेणे, ब्रोनकियल दम्यासाठी खुप प्रभावी ठरते.
५. गर्भधारणेसाठी -