महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

नवजात अर्भक संगोपन सप्ताह २०२० - कोरोनाकाळात अर्भकांची काळजी

नवजात अर्भक कुटुंबात प्रचंड आनंद आणते, परंतु त्यासोबत खूप मोठी जबाबदारीही येते. नवजात अर्भक आपल्या भावना व्यक्त करण्यास किंवा काही सांगण्यास समर्थ नसल्याने, त्यांच्याकडे प्रचंड लक्ष द्यावे लागते आणि त्यांची काळजी घेणे फार आवश्यक ठरते. म्हणून, प्रत्येक वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या १५ तारखेपासून २१ पर्यंतचा आठवडा हा नवजात अर्भक संगोपन सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. मूल जगण्यासाठी आणि त्याची वाढ होण्यासाठी नवजात बाळाची काळजी घेण्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी हा सप्ताह साजरा केला जातो.

new born care week
नवजात अर्भक संगोपन सप्ताह २०२०

By

Published : Nov 23, 2020, 1:56 PM IST

हैदराबाद- भारतीय राष्ट्रीय आरोग्य संकेतस्थळ किंवा एनएचपी असे म्हणते की, नवजाताच्या आयुष्यातील पहिला महिना(जन्मल्यापासून पहिले २८ दिवस) हा मूल जगण्याच्या दृष्टिने अत्यंत महत्वाचा कालावधी आहे. कारण बालपणाच्या इतर कोणत्याही दिवसांपेक्षा याच कालावधीत बाळाचा मृत्यु होण्याचा सर्वाधिक धोका असतो. आयुष्यभरासाठीचे आरोग्य आणि विकासासाठी जीवनातील पहिला महिना हा पायाभूत काळ असतो. सुदृढ बाळे आरोग्यसंपन्न व्यक्तिं म्हणून विकसित होतात ज्यांची भरभराट होऊन आपला समुदाय आणि समाजासाठी योगदान देतात.

सांख्यिकी काय आहे?
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, १९९० ते २०१९ या काळात नवजात बाळांच्या मृत्युचे प्रमाण ५० लाखांवरून २० लाख ४० हजारांपर्यंत उतरले असले तरीही, पहिल्या २८ दिवसांत नवजात बाळांना मृत्युच्या सर्वाधिक धोक्याला सामोरे जावे लागते. जागतिक स्तरावर पाच वर्षांच्या आतील मुलांच्या मृत्युंमध्ये नवजात बाळांच्या मृत्यूचे प्रमाण ४५ टक्के आहे, ज्याच्या परिणामी प्रत्येक वर्षी २० लाख ७० हजार जीव नष्ट होतात. याव्यतिरिक्त, गर्भारपणाच्या अखेरच्या तीन महिन्यांत किंवा प्रसुती सुरू असताना २० लाख ६० हजार नवजात अर्भकांचा मृत्यू होतो. तर दरवर्षी ३०३,००० बाळांचा मृत्यू
प्रसुतीदरम्यान होतो. जन्म झाल्यानंतर लगेचच दर्जेदार आरोग्य सेवा आणि कुशल संगोपन तसेच उपचारांच्या अभावी २०१६ मध्ये २० लाख ६० हजार बालकं जन्माला आल्याच्या पहिल्या महिन्यात मरणाला
सामोरी गेली.

नवजात बाळांच्या मृत्युची कारणे -
जन्माला आल्याच्या पहिल्या २८ दिवसात बहुतेक नवजात बाळांचे मृत्यू होत असले तरीही, अशा घटनांच्या मुख्य कारणांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे.
- मुदतूपूर्व किंवा अकाली प्रसुती
- प्रसूत होताना गुंतागुंत निर्माण होणे
- नवजात शिशुंना संसर्ग
- प्रसुतीवेदना आणि बाळाचा जन्म होताना गुंतागुंत निर्माण होणे

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, नवजात काळ आणि आयुष्याच्या पहिल्या पाच वर्षांपर्यंत, मुलांच्या मृत्युचे मुख्य कारण न्यूमोनिया, हगवण, जन्मजात विकृती आणि मलेरिया हे असतात. कुपोषण हे या सर्वांमागील मूलगामी कारण असते, ज्यामुळे मुलांना अनेक तीव्र स्वरूपाच्या आजारांसाठी कमकुवत बनवले जाते.

नवजात बाळाची काळजी कशी घ्यायची?
आकडेवारीकडे पाहिले असता, तुम्हाला आश्चर्य वाटेल की, नवजात बाळाच्या आरोग्याची काय काळजी घ्यायची. म्हणून जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशींनुसार खाली दिलेल्या गोष्टी तुम्ही करू शकता.
सर्व बाळांना खालील गोष्टी मिळायला हव्यात
• औष्णिक संरक्षण(आई आणि बाळ यांच्यातील स्पर्शाच्या संपर्काला चालना)
• नाळेची स्वच्छता आणि त्वचेची काळजी
• जन्म झाल्यावर लगेचच आणि विशेष स्तनपान
• आरोग्याचे गंभीर समस्यांची लक्षणांचा आढावा किंवा अतिरिक्त काळजी घेण्याची गरज (उदाहरणार्थ ज्या अर्भकांचे वजन जन्मल्या क्षणी कमी भरले आहे, आजारी किंवा एचआयव्ही बाधित आई)
• प्रतिबंधात्मक उपचार(उदाहरणार्थ बीसीजी आणि हेपाटायटिस बी लसीकरण, जीवनसत्व क आणि डोळ्याच्याबाबतीत रोगप्रतिबंधक औषध) कुटुंबांना असा सल्ला दिला पाहिजे
• आवश्यकता भासल्यास त्वरित वैद्यकीय उपचार मिळवा (अन्न भरवताना समस्या किंवा नवजाताच्या हालचाली कमी झाल्या असतील, श्वास घेण्यास त्रास, ताप, फिट्स, थंडी वाजणे यांचा धोक्याच्या चिन्हांमध्ये समावेश आहे)
• जन्माची नोंदणी करा
• राष्ट्रीय वेळापत्रकाप्रमाणे बाळाला लसीकरणाकरता वेळेवर आणा

कोविड-१९ आणि नवजाताची काळजी
गर्भावस्था, प्रसुती किंवा स्तनपानाच्या दरम्यान कोरोना विषाणुचा संसर्ग आईकडून बाळाकडे संक्रमित होतो की नाहि, हे अद्यापही समजलेले नाही. तरीसुद्धा, सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने सांगितल्यानुसार, खालील गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

- कोविड-१९ विषाणुच्या चाचणीत तुम्ही पॉझिटिव्ह आल्याचे निदान झाले तर, आरोग्यसेवा पुरवठादार किंवा डॉक्टरशी तुम्ही नवजात बाळ तुमच्याबरोबर तुमच्याच खोलीत ठेवले तर त्यापासून होणारे लाभ किंवा या धोक्यांबद्दल चर्चा केली पाहिजे.
- नवजात बाळाला हातात धरताना किंवा त्याची काळजी घेताना साबण आणि पाण्याने तुमचे हात किमान २० सेकंद धुवा.

- साबण आणि पाणी उपलब्ध नसेल तर, किमान ६० टक्के अल्कोहोल असलेले सॅनिटायझरचा वापर करा.

- तुमच्या नवजात बाळापासून सहा फुटापर्यंत अंतरावर मास्क वापरा आणि विशेषतः स्तनपान करताना तर अवश्य वापरा.

- तुमच्यापासून नवजात बाळाला शक्य तितके ६ फूट दूर ठेवा. भौतिक अडथळा (उदाहरणार्थ, नवजात बाळाला इनक्युबेटरमध्ये उष्मायक ठेवणे) वापरण्याबाबत तुमच्या डॉक्टर किंवा रूग्णालयाशी चर्चा करा.

- तुमच्या बाळाच्या तोंडावर फेस शिल्ड किंवा मास्क ठेवू नका. फेस शिल्डमुळे नवजातामध्ये अचानक अर्भक मृत्यू होणारे लक्षण वाढण्याची शक्यता असते किंवा अपघाताने बाळाचा जीव गुदमरू शकतो किंवा गळा दाबला जाऊ शकतो.

- बाळाला झोप सुरक्षित लागेल, याची सुनिश्चिती करा. बाळांना आरोग्यसंपन्न ठेवण्यासाठी त्यांची झोप हा महत्वाचा भाग आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details