महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

April Fool Day 2023 : मित्रांसह नातेवाईकांना मूर्ख बनवून साजरा करतात एप्रिल फूल डे, जाणून घ्या रंजक माहिती - खोट्या थापा

एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी एप्रिल फूल डे साजरा करण्यात येतो. या दिवशी नागरिक आपल्या मित्रांसह नातेवाईकांना खोट्या थापा मारुन विनोद करतात.

April Fools Day 2023
संग्रहित छायाचित्र

By

Published : Mar 31, 2023, 4:35 PM IST

Updated : Apr 1, 2023, 6:30 AM IST

नवी दिल्ली : एप्रिल महिन्यातील पहिल्या दिवशी नागरिक एप्रिल फूल डे साजरा करतात. या दिवशी नागरिक आपल्या जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना खोट्या थापा मारुन मूर्ख बनवतात. एप्रिल फूल डे साजरा करण्याची परंपरा ही पाश्चिमात्य देशांमधून आपल्या देशात आली आहे. तरी या दिवशी नागरिक आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना एप्रिल फूल बनवण्यासाठी काहीतरी खास योजना आखतात. पाश्चात्य देशांमध्ये एप्रिल फूल डेच्या दिवशी नागरिक दिवसभर थापा मारुन या दिवसाचा आनंद घेतात.

आनंदासाठी एप्रिल फूल डे :एप्रिल फूल डेच्या दिवशी नागरिक धम्माल मस्ती करतात. नागरिक एकमेकांवर व्यावहारिक विनोद करतात. त्यासह मजेदार गोष्टी करुन धम्माल साजरी करण्याचा प्रयत्न करतात. समोरची व्यक्ती मूर्ख बनवल्यानंतर नागरिकांना हसण्यातून मजा येते. या दिवशी मित्र, कुटुंब, नातेवाईक, शिक्षक, शेजारी, सहकारी इत्यादींसोबत विनोद घडवणारे अनेक उपक्रम करून नागरिक आनंदी होतात. हा दिवस व्यावहारिक विनोद वाढवण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. यामध्ये नागरिक सहज मुर्ख बनतात तर कधी कधी मूर्ख नागरिकही असा विनोद केल्यामुळे नाराज होण्याची शक्याता असते.

वर्तमानपत्रातही असतात विनोदी लेख :जगातील अनेक देशांमध्ये एप्रिल फूलच्या दिवशी आउट ऑफ द बॉक्स इव्हेंट्स आयोजित केले जातात. पारंपरिकपणे बर्‍याच देशांमधील वर्तमानपत्रात विनोदी लेख प्रकाशित केली जातात. काही वर्तमानपत्रात तर मसालेदार आणि मजेदार बातम्याही प्रकाशित करण्यात येतात. न्यूझीलंड, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांमध्ये या प्रकारच्या विनोदाची वेळ दुपारपर्यंत निश्चित केली जाते. त्यानंतर नागरिक त्यांच्या नेहमीच्या कामात गुंतून जातात. ग्रेट ब्रिटनमधील अनेक वृत्तपत्रे 1 एप्रिलला साजऱ्या होणाऱ्या एप्रिल फूलच्या दिवशी पहिल्या पानावर विशेष बातम्या छापतात. याशिवाय फ्रान्स, आयर्लंड, इटली, दक्षिण कोरिया, जपान या देशांबरोबरच रशिया, नेदरलँड, जर्मनी, ब्राझील, कॅनडा, अमेरिका आदी देशांमध्येही दिवसभर विनोद आणि हास्याचे मजेदार किस्से सुरू असतात.

हेही वाचा - National Stress Awareness Month 2023 : तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय तणाव जागृती महिना

Last Updated : Apr 1, 2023, 6:30 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details