डॉक्टर आणि तज्ज्ञ हे सर्व असे मानतात की, चिंता ही अनेक आजारांचे कारण ठरू शकते. सामान्यत: चिंता किंवा एंग्जायटी (Anxiety) झाल्यास देण्यात येणाऱ्या औषधांचे काही पार्श्वप्रभाव होऊ शकतात. याबाबत लोकांच्या मनात भीती आणि संभ्रमही असतात. त्यामुळे, सामान्यत: लोक चिंता किवा मानसिक विकारांच्या स्थितीत आयुर्वेदिक, हर्बल आणि अन्य प्राकृतिक उपचार किंवा औषधीच्या सेवनाला प्राथमिकता देतात.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही हर्बल औषधी आणि आयुर्वेदिक वनस्पतींबाबत माहिती देत आहोत ज्यांच्याविषयी करण्यात आलेले विविध संशोधन आणि आभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की, ते चिंता कमी करण्यास सक्षम असू शकतात. आयुर्वेदिक विशेषज्ञ डॉ.पी.वी रंगनायकुलू सांगतात की, आयुर्वेदमध्ये अश्वगंधा आणि वेलेरियन हर्ब चिंता निवारणासाठी उपयोगात आणली जाते.
अश्वगंधा
अश्वगंधा ही एक प्राचीन आयुर्वेदिक औषध आहे, जिला इंग्रजीमध्ये 'अडाप्टोजेन' असे म्हणतात. ती शरीरातील विविध तंत्रे आणि अशा हार्मोन्सला प्रभावित करते जिला ताण निर्माण करण्यासाठी जबाबदार मानले जाते. चिंता आणि नैराश्यामध्ये अश्वगंधाच्या उपयोगाबाबत वर्ष 2019 मध्ये एक छोटी वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. 8 आठवड्यांच्या कालावधीच्या या अभ्यासात तणावात किंवा चिंताग्रस्त असलेल्या 58 व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. यादरम्यान वेगवेगळ्या गटातील सहभागींना तीन प्रकारचे उपचार देण्यात आले होते.
एका गटाला दररोज 250 मिलीग्राम (mg) तर, दुसऱ्या गटाला दररोज 600 मिलीग्राम अश्वगंधाचे अर्क देण्यात आले, तेच एका गटाला प्लेसिबोचा (मानसिक समस्येत देण्यात येणारी औषधी) डोस देण्यात आला. यात अश्वगंधा घेणाऱ्या सहभागींमध्ये प्लेसिबो देण्यात आलेल्या गटाच्या तुलनेत तणावासाठी जबाबदार असलेले हार्मोन 'कोर्टिसोल' कमी आढळले, त्याचबोरबर या सहभागी व्यक्तींच्या झोपेच्या गुणवत्तेत देखील सुधार दिसून आला. त्याचवेळी, 600 मिलीग्राम अश्वगंधा घेतलेल्या सहभागींमध्ये तणावाच्या पातळीत लक्षणीय घट दिसून आली.
कॅमोमाइल
कॅमोमाइल ही एका फुलापासून निर्माण होणारी औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीचा चहा आजकाल देशात आणि परदेशात खूप लोकप्रिय आहे. कॅमोमाइल दोन प्रकारची असते - रोमन कॅमोमाइल आणि जर्मन कॅमोमाइल. या दोघांचाही लोक औषधीरुपात उपयोग करू शकतात. 2016 च्या वैद्यकीय चाचणीत सामान्यीकृत चिंता विकारासाठी (GAD) दीर्घकाळ उपचार म्हणून कॅमोमाइलची गुणकारिता आणि सुरक्षितता तपासण्यात आली होती.
या चाचणीत सर्व 93 सहभागी व्यक्तींना 12 आठवड्यांपर्यंत दररोज 1 हजार 500 मिलीग्राम कॅमोमाइल घेतली. 26 आठवड्यांनंतर अर्ध्या सहभागींनी कॅमोमाइलऐवजी प्लेसिबो घेण्यास सुरुवात केली, तसेच अर्ध्या सहभागींनी कॅमोमाइल घेणे सुरूच ठेवले. चाचणीनंतर संशोधकांना असे आढळून आले की, ज्या सहभागींनी कॅमोमाइल घेणे सुरू ठेवले त्यांच्यात प्लेसिबो घेतलेल्या सहभागींच्या तुलनेत सुरुवातीला फारसा फरक दिसला नाही. परंतु, जेव्हा त्यांची समस्या रिलॅप्स्ड झाली तेव्हा त्यांच्यात आधीच्या तुलनेत आणि सामान्य अवस्थेच्या तुलनेत कमी गंभीर लक्षण दिसून आलेत. येथे हे माहिती असणे देखील आवश्यक आहे की, काही लोकांना कॅमोमाइलची अॅलर्जी देखील होऊ शकते. तुम्हाला रॅगवीड (Ragweed), क्रिसॅन्थेमम (Chrysanthemum), झेंडू (Marigold), रोझमेरीची अॅलर्जी असेल तर तुम्हाला कॅमोमाइलची अॅलर्जी असू शकते.
याशिवाय कॅमोमाइल चहा किंवा सप्लिमेंटचे सेवन वैद्यकीय सल्ल्यानंतरच करावे, कारण कॅमोमाइल काही औषधींबरोबर परस्पर क्रिया करू शकते, जसे रक्त पातळ करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधी वॉर्फेरिन आणि अँटिरिजेक्शन ड्रग सायक्लोस्पोरिन.