वॉशिंग्टन [यूएस] :अल्झायमर रोग हा 'विसरण्याचा आजार' (Alzheimer disease) आहे. या आजाराच्या लक्षणात स्मरणशक्ती नष्ट होते. शिवाय, बोलण्यास अडचण येणे, निर्णय घेण्यात असमर्थ असणे. मधुमेह, आधुनिक जीवनशैली, रक्तदाब आणि डोक्याला अनेकवेळा मार लागणे हे आहे. मार लागल्याने या आजाराचे प्रमाण वाढण्याची आशंका वाढते. नवीन यूएससी लिओनार्ड डेव्हिस स्कूल ऑफ जेरोन्टोलॉजी अभ्यासाने मेंदूमध्ये अॅमलॉइड बीटा (Amyloid beta) नावाचे प्रथिने तयार होणे अल्झायमर रोगाशी कसे संबंधित आहे या कल्पनांना आव्हान दिले आहे. अॅमलॉइड प्रथिने तयार होणे हा अल्झायमर-संबंधित न्यूरोडीजनरेशनशी संबंधित आहे. प्रथिनांचा मेंदूच्या सामान्य वृद्धत्वाशी कसा संबंध आहे याबद्दल फारसे माहिती नाही, असे विद्यापीठाचे प्राध्यापक कॅलेब फिंच म्हणाले.
विचार करण्याची आणि स्मरण क्षमता कमजोर होते : 60 वर्षे वयाच्या जवळपास वय असणाऱ्या लोकांमध्ये हा आजार उद्भवू शकतो. आजाराच्या सुरुवातीला नियमित तपासणी आणि उपचाराने नियंत्रण ठेवू शकतो. या आजारावर काही स्थायी उपाय नाही. मस्तिष्कच्या स्नायूंच्या क्षरणाने पेशंटच्या बौद्धिक क्षमता आणि व्यावहारिक लक्षणांत पण फरक पडतो. माणूस जसजसा म्हातारा होत जातो तसतशी त्याची विचार करण्याची आणि स्मरणाची क्षमतापण कमजोर होत जाते. मानवी मेंदूतील अॅमलॉइड बीटा (Amyloid beta) चे स्तर शोधण्यासाठी, संशोधकांनी निरोगी मेंदू आणि स्मृतिभ्रंश असलेल्या रुग्णांच्या मेंदूतील (symptoms of Alzheimer) ऊतींचे नमुने घेतले. अल्झायमरची अधिक गंभीर प्रकरणे उच्च ब्रॅक स्टेजिंग स्कोअरद्वारे दर्शवली गेली.