अल्झायमर (Alzheimer) रोग हा डिमेंशियाचा एक प्रकार आहे. याला वृद्धांचा आजार देखील म्हणतात. त्यामुळे, पीडितला विसरण्याची समस्या होऊ लागते. समस्या गंभीर झाल्यास केवळ पीडितची मज्जासंस्थाच नव्हे तर, शरीराच्या इतर यंत्रणा आणि त्यांची कार्ये देखील प्रभावित होऊ लागतात आणि त्यांचे शरीरावरील नियंत्रण कमी होऊ लागते. प्राणघातक म्हणल्या जाणाऱ्या या आजाराबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर, या आजाराविषयी चर्चा करणे गरजेचे आहे, जेणेकरून अधिकाधिक लोकांना या आजाराची लक्षणे, त्याचे परिणाम आणि त्याच्या उपचारांबद्दल माहिती मिळू शकेल. यामुळे या वर्षीचे विश्व अल्झायमर दिवस 'लेट्स टॉक अबाऊट डिमेंशिया' या थीमवर साजरा केला गेला.
इतिहास
जागतिक अल्झायमर दिवस साजरा करण्याची सुरुवात 21 सप्टेंबर 1994 साली एडिनबर्गमध्ये एडीआईच्या वार्षिक सम्मेलनादरम्यान झाली होती. जर्मन मानसोपचारतज्ज्ञ आणि न्यूरोपॅथॉलॉजिस्ट डॉ. अल्झायमर यांनी सर्वात आधी 1906 साली हा रोग शोधून काढला. त्या काळी मानसिक आजारामुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता. मृत्यूच्या कारणांच्या निरीक्षणादरम्यान महिलेच्या मेंदूमधील ऊतींमध्ये बदल दिसून आला. तापसणीत समोर आलेल्या या आजाराला अल्झायमर हे नाव देण्यात आले आणि त्यास घातक रोगांच्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आले. विशेष म्हणजे, सप्टेंबर महिना अल्झायमरला समर्पित करण्यात आला आहे.
अल्झायमर हा वृद्धांचा आजार
सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), नवी दिल्लीकडून जारी करण्यात आलेल्या एका एडवायझरीत सांगण्यात आले होते की, वर्ष 2011 च्या जनगणनेनुसार, देशात जवळपास 16 कोटी वद्ध आहेत (60 वर्षांवरील). त्यात 60 ते 69 वर्षांपर्यंतचे 8.8 कोटी, 70 ते 79 वर्षांपर्यंतचे जवळपास 6.4 कोटी, इतरांवर अवलंबून असलेले 80 वर्षांचे जवळपास 2.8 कोटी आणि 18 लाख वृद्ध असे आहेत ज्यांचे स्वत:चे घर नाही किंवा त्यांची काळजी करणारे कोणी नाही.
आकड्यांनुसार, भारतात जवळपास 40 लाखांपेक्षा अधिक लोकांना कोणत्या न कोणत्या प्रकारचा डिमेंशिया आहे. तेच जगभरात कमीत कमी 4 कोटी 40 लाख लोक डिमेंशियाने ग्रस्त आहेत, ज्यांमध्ये बहुतांश वृद्ध आहेत. डॉक्टर आणि तज्ज्ञ मानतात की, हा आकडा अधिक असू शकतो, कारण बहुतांश वृद्ध माहिती अभावी आणि अन्य आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक कारणांमुळे ही समस्या झाल्यास डॉक्टरांशी संपर्क साधू शकत नाही.
अल्झायमर रोगाची कारणे?
हे खरे आहे की, या आजाराला वृद्धांचा आजार असे म्हटले जाते, मात्र अल्झायमरसाठी नेहमी अधिक वय जबाबदार नसते. हा रोग काही विशेष परिस्थितीमध्ये काही अन्य कारणांनी देखील होऊ शकतो, जी पुढील प्रमाणे आहेत,
1) जेनेटिक कारण - कुटुंबात अल्झायमर रोगाचा इतिहास असताना देखील हा रोग होण्याची शक्यता असू शकते.
2) डोक्याला दुखापत होणे - जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्याला दुखापत झाली असेल तर, त्यास अल्झायमर आजार होण्याचा धोका असू शकतो.
3) दुसरा रोग होणे - अनेक वेळा मधुमेह किंवा हृदयविकारासंबंधी आजाराने पीडित लोकांमध्ये देखील अल्झायमरची लक्षणे दिसू शकतात. अशा लोकांनी त्यांच्या आजारावर योग्य प्रकारे उपचार केले पाहिजेत, जणेकरून त्यांना अल्झायमरसारखा गंभीर आजार होणार नाही.
4) तणाव असणे - अल्झायमर रोगाचा धोका तणावग्रस्त व्यक्तींमध्ये देखील अधिक असतो.
अल्झायमरची लक्षणे